5️⃣ आमरण अनशन – दिन 5
आज दिनांक 08.11.2025 को दोपहर 2 बजे हमारे दो साथियों की तबीयत काफी बिगड़ गई। शुगर सामान्य स्तर से नीचे जाने के कारण उन्हें तेज चक्कर आ रहे हैं। फिर भी मैनेजमेंट हमारी मांगों को मानने के लिए तैयार नहीं है।
अनशन करना हमारा कानूनी अधिकार है, मगर मैनेजमेंट ने S L RAHEJA अस्पताल की एम्बुलेंस और डॉक्टरों की टीम बुलाकर हमारे दो साथियों को अस्पताल ले जाने की कोशिश की। लेकिन अनशन पर बैठे साथियों ने यह कहते हुए जाने से इनकार कर दिया कि वे यहाँ से नहीं हटेंगे। जब तक हमारी मांगें पूरी नहीं होंगी, हम यहाँ से नहीं हटेंगे—यही हमारा दृढ़ निर्णय है।
मित्रों, आप सभी से विनती है कि आज, कल और आगे भी अधिक से अधिक संख्या में आंदोलन में शामिल हों। आपकी संख्या बहुत महत्वपूर्ण रहने वाली है।




आमरण उपोषण दिवस 5. आज दिनांक 08.11.2025 रोजी दुपारी 2 वाजता आपल्या दोन सहकाऱ्यांची तब्येत जास्त प्रमाणात खालवली.शुगर प्रमाणापेक्षा खाली आल्यामुळे त्यांना जास्त चक्कर येत आहे,तरी मॅनेजमेंट अजूनही आपल्या मागण्या मान्य करायला तयार नाही .. उपोषण करणे हा आपला कायद्याने दिलेला हक्क आहे पण मॅनेजमेंटने S L RAHEJA हॉस्पिटलची ॲम्बुलन्स व डॉक्टरची टीम बोलवून आपल्या दोन सहकाऱ्यांना हॉस्पिटलला नेण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु आम्ही इथून हलणार नाही असे बोलून उपोषणकर्त्यांनी जाण्यास नाकार दिला, जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नाही हाच पवित्रा आपण घेत आहोत.. मित्रांनो आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने आज , उद्या पुढे आंदोलनासाठी यावे. आपली संख्या खूप महत्त्वाचे असणार आहे….
बंधू आणि भगिनींनो,
*आज दिवसभरात झालेल्या घडामोडींची आणि यापुढील आपल्या वाटचालीची माहिती देण्या करिता आज दि.०९ .११.२५ रोजी रात्री ठीक ९.०० वाजता तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे तीव्र आंदोलन आज आंदोलनाचा ६ वा दिवस आहे.*
पुढील लिंक वर क्लिक करून आपण VC मध्ये सहभागी होऊ शकता:
https://meet.google.com/yag-ivki-pai
कामगार एकता जिंदाबाद!
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई
आपल्या हक्काचा National Holiday चा ओव्हरटाईम, EXTRA डयुटीचा c-off व्यवस्थापनाने बंद केला आहे. प्लांन्ट्स मध्ये GH चा ओवरटाइम व्यवस्थापनाने बंद केला आहे. डांगरी आणि सेफ्टी शुज सारखी PPE देण्यास मैनेजमेंट अजूनही असमर्थ आहे. फुड बॉक्स ही ७ दिवसांच्या ऐवजी १०-१२ दिवसांनी येतोय.
हे सगळे असताना मात्र व्यवस्थापन ऑफशोअर ला पाण्याच्या बाटल्या पाठवणे बंद करून त्याऐवजी Water Maker चे पाणी पिण्यास सुरवात करू पाहत आहे.
या अन्यायाविरुद्ध पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे तीव्र आंदोलन आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी VC चे आयोजन करण्यात आले आहे. आज दि.०९ .११.२५ , आंदोलनाचा ६ था दिवस आहे. आज दि.०९ .११.२५ रात्री ०९.०० वा पुढील लिंक वर क्लिक करून आपण VC त सहभागी होऊ शकता:
https://meet.google.com/yag-ivki-pai
कामगार एकता जिंदाबाद!
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई
आपल्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी बळजबरीने हॉस्पिटलला हलवले आहे.. त्यांचे प्रकृती अचानक ढासळली होती डॉक्टरचा अहवाल आल्यावर मॅनेजमेंटच्या आग्रहावर पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.




