रुग्णालय एम्पॅनेलमेंटबाबत महत्त्वाची माहिती
कामगार बांधवांनो,
ओएनजीसी कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना अधिक चांगल्या आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विविध नामांकित रुग्णालयांच्या एम्पॅनेलमेंटसंदर्भात सकारात्मक प्रगती झाली आहे.
खालील रुग्णालयांच्या एम्पॅनेलमेंटसंदर्भातील प्रक्रिया पूर्णत्वाच्या टप्प्यात असून, अधिकृत आदेश लवकरच अपेक्षित आहे:
कोकिलाबेन रुग्णालय
फोर्टिस रुग्णालय, वाशी
डी. वाय. पाटील रुग्णालय, पुणे
केआयएमएस किंग्सवे रुग्णालय, नागपूर
एच. जी. कॅन्सर रुग्णालये
ज्युपिटर रुग्णालय, ठाणे
केआयएमएस रुग्णालय, ठाणे
ज्युपिटर रुग्णालय, डोंबिवली पूर्व
तसेच मंगेशकर रुग्णालय, पुणे यांच्या एम्पॅनेलमेंटची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठीही युनियनकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
वरील एम्पॅनेलमेंटसंदर्भातील अधिकृत सूचना आदेश लवकरच ओएनजीसीच्या इंट्रानेट एमआरवर प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे. अधिकृत आदेश प्रसिद्ध झाल्यानंतरच संबंधित सुविधा, अटी व इतर तपशीलांची अंतिम माहिती स्पष्ट होईल.
यासोबतच नाशिक येथील अशोका मेडिकव्हर, कोल्हापूर येथील तसेच महाराष्ट्रातील इतर शहरांमधील रुग्णालयांचे एम्पॅनेलमेंट लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा करत आहे.
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये अधिकाधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
कामगारांच्या हितासाठी, त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी आणि सुविधांच्या विस्तारासाठी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन सातत्याने प्रयत्नशील आहे.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन
मान्यताप्राप्त युनियन
डब्ल्यू.ओ.यू., ओएनजीसी, मुंबई
