This is the new official website of PEU, Mumbai. Petroleum Employees Union,Mumbai is the recognized union of employees working in Mumbai region this is the official website of the Petroleum Employees Union,Mumbai.PEU Mumbai & KS Mumbai i.e. Karmachari Sanghatana are the 2 unions present in Mumbai region.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन ओ एन जी सी उरण सयंत्र दि. 18.03.2026 रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले त्या शिबिरास आपण भरभरून प्रतिसाद देऊन 722 रक्तदात्यांनी रक्तदान करून आमच्या कार्यावर जो विश्वास दाखवलात त्या बद्दल सर्व कामगारांचे तसेच रक्तदात्यांचे आम्ही सर्वस्वी मनापासून आभार मानतो
हेलिबेस येथे मेडिकल बिल्स सबमिट करताना कामगारांना होत असलेल्या गैरसोयीबाबत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेडिकल इन्चार्ज (मुंबई) डॉ. श्री. एम. व्ही. शेनॉय साहेब यांच्याशी चर्चा करून स्वतंत्र TPA स्टेशन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती.
यासंदर्भात युनियनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून सदरील TPA चे प्रतिनिधी आता हेलिबेस येथे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे कामगार बांधव आपली मेडिकल बिले हेलिबेस येथेच सबमिट करू शकतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
तसेच, सदरील TPA प्रतिनिधी प्रत्येक एक महिन्याच्या सलग पासवर हेलिबेस येथे उपलब्ध राहतील. यामध्ये कोणताही खंड पडू नये यासाठी त्यांच्या पासच्या नूतनीकरणाची आगाऊ प्रक्रिया देखील सुरू ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून सेवा अखंड सुरू राहील व कामगारांची कोणतीही गैरसोय होणार नाही.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन (मान्यताप्राप्त युनियन) डब्ल्यू.ओ.यु., ओएनजीसी, मुंबई
PPE सारख्या गंभीर प्रश्नावर संपाची हाक देत आपल्या बांधवांना न मिळालेल्या PPE सारख्या अतिशय गरजेच्या असणाऱ्या साधनांकरिता आपण आस्थापनेबरोबर आंदोलनाचा माध्यमातून दोन दोन हात करीत तसेच वेळोवेळी गरज पडल्यास चर्चा करून आणि त्याचा पाठपुरावा चालू ठेवला, आपला हा आंदोलनाचा बडगा आणि चर्चा त्याचबरोबर आपल्या सर्व कामगारांच्या सहभागाला यश आले असून पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने घेतलेल्या ठाम व कठोर भूमिकेमुळे व्यवस्थापनाला आपली निष्क्रिय भूमिका बदलून सेफ्टी शूज करिता तातडीने पूर्वीचे काँट्राक्ट संपवून नवीन काँट्राक्ट करावे लागले आहे .*
यामध्ये यापूर्वी कार्यरत असलेल्या “लान्सर” कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट समाप्त करून आता “कॉन्टा ब्ल्यू” या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे आपल्या संघटित लढ्याचा आणि एकजुटीचा स्पष्ट विजय आहे.
ऑफशोअरमध्ये नवीन कंपनीचे जवळ जवळ ३५०० शूज पुरविण्यास सुरुवात झाली असून, लवकरच “कॉन्टा ब्ल्यू” कंपनीचे सेफ्टी शूज सर्व प्लॅटफॉर्म आणि रिग्सवर उपलब्ध होतील त्याचबरोबर ओव्हर ऑल म्हणजेच डांगरी करिता देखील आपला पाठपुरावा चालू असून त्याच्या वितरणा बद्दल माहिती आपल्याला लवकरच कळविण्यात येईल.
*दरम्यान सदर शूज प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी, गुणवत्ता संदर्भातील अडचण किंवा इतर समस्या आढळल्यास कृपया तात्काळ युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आपल्या सूचनांच्या आधारे व्यवस्थापनाशी ठोस व प्रभावी पाठपुरावा करण्यात येईल, ही विनंती.
कामगारांच्या हक्कांसाठीचा मुजोर अस्थापनेविरोधात लढा सुरूच राहणार फक्त आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि सहभागीही नितांत गरज आहे. मित्रानो,प्रत्येक सकारात्मक बदल हा आपल्या एकतेचा आणि संघर्षाचा परिणाम आहे.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, मान्यताप्राप्त युनियन, डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई
ऑफशोअरमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या कामगार बांधवांना हेलिबेस येथे मेडिकल बिल्स सबमिट करताना गेल्या बऱ्याच दिवसांपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेडिकल इन्चार्ज (मुंबई) डॉ. श्री. सदाशिव शेनॉय साहेब यांच्याशी वसुधारा भवन येथे सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगारांना प्रत्यक्ष भेडसावणाऱ्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून देत, यावर तात्काळ आणि व्यवहार्य तोडगा काढण्याची आग्रही मागणी युनियनने केली आहे.
युनियनची स्पष्ट मागणी अशी आहे की, एन्ट्री पास मुळे आत मध्ये येवू न शकणाऱ्या एम्प्लॉईजची गैरसोय होऊ नये याकरिता एक स्वतंत्र TPA स्टेशन हेलिबेसच्या बाहेरील नवीन Entry–Exit गेटवर, MSF काउंटरलगत उपलब्ध करून देण्यात यावे. यामुळे ऑफशोअरला जाणाऱ्या तसेच ऑफशोअरवरून परत येणाऱ्या कामगारांना हेलिबेसच्या आत प्रवेश न करता, तसेच एयरपोर्ट अथोरिटीच्या एंट्री पासची कोणतीही आवश्यकता न लागता, येता-जाता आपली मेडिकल बिले सहज आणि वेळेत सबमिट करता येतील तसेच सध्या AEP पास करिता असलेली प्रक्रिया लवकरात लवकर करून आपल्या ऑफशोर मधील बांधवांची होणारी गैरसोय दूर करावी.
या मागणीवर मेडिकल इन्चार्ज मुंबई यांनी सकारात्मक व तात्काळ निर्णय घेतील असे आश्वासन देण्यात आले आहे.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, (मान्यताप्राप्त युनियन) डब्ल्यू.ओ.यु., ओएनजीसी, मुंबई