प्रिय बंधू आणि भगिनींनो,
आपल्याला माहीतच आहे की, २९.०८.२०२४ ला व्यवस्थापनेकडून ऑफशोअरला जाणाऱ्या ऍम्प्लॉईजना फास्ट क्रु-बोटीने पाठवण्याबाबतची एकतर्फी ऑर्डर काढण्यात आली होती.
त्यावर सदर विषयाची गंभीरता लक्षात घेऊन पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने ताबडतोब व्यवस्थापनेला घेराव करून व पत्र पाठवून फास्ट क्रु-बोटी ने कामगार जाणार नाहीत व आपण कामगारांची एक जबाबदार युनियन म्हणून आलेल्या ऑर्डरचा जाहीर निषेध व विरोध करतो असे ठणकावून सांगण्यात आले.
सदर पत्राचा परिणाम म्हणून व सदर बाबतचा पाठपुरावा करण्यासाठी आज सकाळी ED-WOU यांची भेट घेऊन जाब विचारला असता, व्यवस्थापनाने फास्ट क्रु-बोटीने फक्त कंत्राटी कामगारच(Contracutal Manpower) जातील आणि ओएनजीसी ऍम्प्लॉई जाणार नाहीत असे स्पष्ट केले. पुढील दिशा ठरवण्याआधीच आपल्या पहिल्याच प्रयत्नाला यश आले आहे.
टीप: फास्ट क्रु-बोटीने फक्त Contractual Manpower च जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी…!
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई
बंधू आणि भगिनींनो,
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तर्फे, ओ.एन.जी.सी मध्ये चालू असलेल्या घडामोडी तसेच विविध विषयांशी संलग्नित असलेल्या बाबींवर प्रकाश टाकून त्याबाबत सविस्तर आढावा घेण्यासाठी “गूगल मिट” द्वारे चर्चा सत्र घेण्याचे ठरविले आहे.
दि. ०४/०९/२०२४, रोजी रात्री ठीक ०८:४५ वा. पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी आपल्यासोबत गूगल मिट वरून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बहुविध बाबींवर सविस्तर चर्चा करणार आहेत, याकरीता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जास्तीत जास्त प्रमाणत एकाच ID वरून जॉईन करण्याचा प्रयत्न करा…!
Google Meet link:
https://meet.google.com/oou-kvei-dzx
टीप: मिटींग मध्ये आपले जे प्रश्न असतील ते आपण आत्तापासुनच पुढील Link वर click करून Google form द्वारा विचारू शकता, जेणे करून कोणाचेही प्रश्न अनुत्तरीत राहणार नाही, आणि मिटींग मध्ये प्रश्न- उत्तराच्या वेळी होणारा गोंधळ टाळता येईल:
Google Form link:
https://forms.gle/4R1L9xajiQ3EBeWY6
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई