प्रिय बंधू आणि भगिनींनो,
ऑफशोअरमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या कामगार बांधवांना हेलिबेस येथे मेडिकल बिल्स सबमिट करताना गेल्या बऱ्याच दिवसांपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेडिकल इन्चार्ज (मुंबई) डॉ. श्री. सदाशिव शेनॉय साहेब यांच्याशी वसुधारा भवन येथे सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगारांना प्रत्यक्ष भेडसावणाऱ्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून देत, यावर तात्काळ आणि व्यवहार्य तोडगा काढण्याची आग्रही मागणी युनियनने केली आहे.
युनियनची स्पष्ट मागणी अशी आहे की, एन्ट्री पास मुळे आत मध्ये येवू न शकणाऱ्या एम्प्लॉईजची गैरसोय होऊ नये याकरिता एक स्वतंत्र TPA स्टेशन हेलिबेसच्या बाहेरील नवीन Entry–Exit गेटवर, MSF काउंटरलगत उपलब्ध करून देण्यात यावे. यामुळे ऑफशोअरला जाणाऱ्या तसेच ऑफशोअरवरून परत येणाऱ्या कामगारांना हेलिबेसच्या आत प्रवेश न करता, तसेच एयरपोर्ट अथोरिटीच्या एंट्री पासची कोणतीही आवश्यकता न लागता, येता-जाता आपली मेडिकल बिले सहज आणि वेळेत सबमिट करता येतील तसेच सध्या AEP पास करिता असलेली प्रक्रिया लवकरात लवकर करून आपल्या ऑफशोर मधील बांधवांची होणारी गैरसोय दूर करावी.
या मागणीवर मेडिकल इन्चार्ज मुंबई यांनी सकारात्मक व तात्काळ निर्णय घेतील असे आश्वासन देण्यात आले आहे.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
(मान्यताप्राप्त युनियन)
डब्ल्यू.ओ.यु., ओएनजीसी, मुंबई
