[blink] New [/blink]
कामगार बंधू व भगिनींनो
काल दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ रोजी लेबर कमिशनर यांच्या कार्यालयात सायंकाळी ४.०० वाजताOT संदर्भात मीटिंग झाली.
या मीटिंग मध्ये पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तर्फे श्री सुरेश ननावरे साहेब, श्री संतोष पाटील साहेब, श्री संदीप रेवंडकर साहेब व श्री श्रीनिवास आचार्य उपस्थित होते व व्यवस्थापना तर्फे इंचार्ज आय/आर श्री गणेशन साहेब व श्री दक्ष साहेब उपस्थित होते.
मार्च २०२० मध्ये lockdown च्या काळात ऑफशोर वरील सर्व कामगारांनी १४ दिवसांच्या ड्युटी ऐवजी ७० ते ७५ दिवस ड्युटी केली आहे व त्यानंतर देखील ४० ते ५० दिवस सतत ड्युटी करत आले आहेत, व आज ही २८ ते ४२ दिवस ड्युटी करत आहेत,
व ह्या extra ड्युटी साठी जो मोबदला कामगारांना मिळाला पाहिजे ते देण्यास मॅनेजमेंट टाळाटाळ करत आहे व Head Quater वरून जो निर्णय येणार होता OT संदर्भात तो देखील येत नाही.
१) आपण त्यांना वारंवार हे सांगत आलोय की OT चा विषय हा Local level ला solve होण्या सारखा असताना देखील तुम्हाला तो Delay करण्या साठी Head Quater कडे घेऊन गेले, जे नेण्याची गरज नव्हती.
२) आपल्या सतत च्या पाठपुराव्यानंतर देखील मॅनेजमेंट आपल्या OT संदर्भातल्या मागण्या मान्य करत नसल्याचे दिसून येताच आता लेबर कमिशनर ने थेट ED Chief ER ला नोटीस देण्याचे ठरवले आहे
३) तुम्ही Dehradun ला OT संदर्भात जो Proposal बनवलं आहे तो नेमका काय आहे, ते आम्हाला कळलं पाहिजे असे देखील आपण सांगितलं आहे,
पुढील सुनावणी ०७ एप्रिल ला सकाळी १०.३० वाजता निश्चित करण्यात आली आहे.
आणि जर ह्या दिवसा पर्यंत देखील OT बद्दल काही ठोस निर्णय नाही झाला तर ही आपली शेवटची मीटिंग असेल असे ठामपणे लेबर कमीशनर ला सांगण्यात आले आहे.
मग डायरेक्ट Action प्लॅन
कामगार एकता जिंदाबाद
पि.ई.यु. जिंदाबाद
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन (मुंबई)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


