Posted in Uncategorized | Comments Off on

कामगार बंधु आणि भगिनींनो ,

आपणांस २१ दिवसांचा ड्युटी पॅटर्न नुसार कुठल्याही ओव्हरटाईम शिवाय ड्युटी करायची आहे का??

दडपशाही करणाऱ्या मॅनेजमेंट च्या या तुघलकी फर्माना विरोधात फक्त पेट्रोलियम एम्प्लाईज युनियन लढा देते आहे.

PEU चा हा लढा संपुर्ण संवैधानिक मार्गाचा असुन यात कुठल्याही कामगाराचे कोणतेही नुकसान होणार नाही याची संपुर्ण काळजी PEU घेत आहे.

PEU ची संपुर्ण टीम यासाठी तन, मन, धनाने अहोरात्र कार्यरत आहे.आपण या लढयात आपल्या परीने सहभागी होऊन हा लढा यशस्वी करण्यासाठी मदत करूया.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन ,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Kindly refer the complete pdf document attached below for more details:

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो,

सध्या CPP व TA बिलांसंदर्भात अनेक तक्रारी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन कडे आल्या होत्या. यासंदर्भात आज पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन चे जनरल सेक्रेटरी श्री. संतोष पाटील साहेब, श्री. आशिष जग्यासी व इतर पदाधिकाऱ्यांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. काही issues वर सकारात्मक चर्चा होऊन योग्य निर्णय झाला आहे , काही issue बद्दल संबंधीत अधिकार्‍यानी थोडा वेळ मागितला आहे. पुढील ३-४ दिवसांत पुन्हा एकदा बैठक घेऊन सर्व अडचणी सोडविण्यात येतील. तोवर जर TA बिलासंबधी काही अडचण असेल तर ते TA बिल सबमिट करू नये तसेच संबंधीत अधिकार्‍याशी ही त्या अडचणी बाबत सध्या संपर्क करू नये, लवकरच आपणास पुढील अपडेट कळविण्यात येईल. TA बिलासंबंधी काही अडचण असल्यास 7710091222 या क्रमांकावर श्री. जग्यासी यांच्याशी संपर्क साधावा.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on

आपल्या ऑफशोअर मध्ये असलेल्या मित्रांपैकी काहींनी त्यांच्या समस्या सांगुन त्यासंदर्भातल्या इमेल चा फॉरमॅट मागितला होता. ते फॉरमॅट पुढील प्रमाणे आहेत, सदर email आपण आपल्या प्लॅटफार्म / रीग च्या OIM ना पाठवु शकता आणि cc मध्ये 70899 / 71931 पाठवा.

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो,

अस्थापनेच्या २१ दिवसाच्या एकतर्फी निर्णयाचा विरोधातील महत्वाच्या घडामोडीच्या माहितीकरिता व पेट्रोलियम एम्प्लॉयीज युनियन च्या यापुढील रणनीती संदर्भात चर्चा करण्यासाठी आज दी.२७/०५/२०२५ रात्री 09.00वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चे आयोजन करण्यात आले आहे.

पुढील link वर क्लिक करून आपण meeting join करू शकता.

meet.google.com/gko-fkwq-ikp

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,

डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on