ऑफशोअर मधील कामगारांकरिता महत्त्वाची सूचना!!
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ऑफशोअर करिता CREW BOAT द्वारे पॅसेंजर वाहतूक सुरुवात ONGC कडून करण्यात आली आहे, परंतु सदर व्यवस्था ही CONTRACTUAL WORKFORCE करिता असून ओएनजीसी एम्प्लॉइज करिता नाही आणि ONGC एम्प्लॉइज करिता कोणतीही अधिकृत चर्चा पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन बरोबर करण्यात आलेली नाही.
ONGC EMPLOYEES करिता अश्या TRANSPORTATION करिता पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियनचा ठाम विरोध आहे आणि सर्व एम्प्लॉइज ना विनंती आहे की आपण कोणीही कोणत्याही दबाव अथवा भूलथापांना बळी पडू नये आणि आपली भूमिका स्पष्ट आणि ठाम ठेवू आणि पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन बरोबर खंबीरपणे उभे राहावे.
संतोष ज पाटील
जनरल सेक्रेटरी
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन, मुंबई, WOU.
🚩🙏 धन्यवाद 🙏🚩
🙏बंधू आणि भगिनींनो,🙏
ऑफशोअर मध्ये कार्यरत असलेल्या व महाराष्ट्राच्या विविध भागातून ऑफशोअर ड्यूटी करिता जाणाऱ्या बांधवांकरिता आपल्या दी.१०/१०/२०२३ व ०१/११/२०२३ रोजी च्या पत्रा अन्वये हेलिबेस येथे फ्रेश अप- चेंजींग रूम तसेच हेलिबेस येथे reporting नंतर उशिरा Sortie असल्यामुळे हेलिबेस येथे थांबून ऑफशोअर ला गेल्यावर नाईट शिफ्ट जॉईन करणाऱ्या बंधू आणि भगिनींना हेलीबेस येथे रेस्ट रूम करिता सुविधा उपलब्ध करण्याकरिता आपण मागणी केली होती व त्यानंतरही सतत त्याचा पाठपुरावा चालू ठेवला होता, ज्याची पूर्तता व्हायला सुरुवात झाली असून अस्थपणेने प्राथमिक स्वरूपात हेलिबेस येथे टीव्ही जवळ रूम क्रमांक.२ येथे तात्पुरते फ्रेश अप व चेंजिंग सुविधा सुरू केली आहे, तसेच आज आपले जनरल सेक्रेटरी श्री.संतोष पाटील साहेब व DGS. श्री संदीप रेवंडकर साहेब यांनी सर्व कार्यकर्त्यांसह भेट देऊन सध्या दिलेल्या सुविधे मध्ये काही बदल करण्याकरिता सूचना दिल्या असून सदर तात्पुरते स्वरूपाची सुविधा ही अजुन चांगली करून सुचविलेल्या नवीन ठिकाणी सुसज्ज स्वरूपात करण्या बाबत चर्चा केली व अस्थापनेकडून देखील ते मान्य करण्यात आले आहे.
ही सुविधा देखील लवकरच सुरू करण्याचे मान्य केले आहे.
🚩आपले पाठबळ हीच ताकत !!!🚩
आपला,
संतोष ज पाटील
जनरल सेक्रेटरी
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन, मुंबई,WOU.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩



