✌️✌️🚩वचनपुर्ती🚩✌️✌️

प्रिय बंधू आणि भगिनींनो💐,

४००००/- पेक्षा कमी बेसिक असलेल्यांना फक्त अर्धाच CPP मिळत होता.

पूर्ण CPP न मिळाल्याने आपल्या ऑफ़शोरच्या कामगार बंधू आणि भगिनींचं बऱ्यापैकी नुकसान होऊन आर्थिक झळ बसत होती.

कामगारांचे एवढे आर्थिक नुकसान होत असतानाही तत्कालीन मान्यताप्राप्त युनियन ने याबाबत काहीही केले नाही.

निवडणुकीपुर्वी PEU ने घेतलेल्या V.C. मध्ये जेव्हा हा मुद्दा विचारण्यात आला , तेव्हा PEU च्या General secretary श्री. संतोष पाटील साहेबांनी घोषणा केली होती की,
” यंदाच्या निवडणुकीत PEU मान्यताप्राप्त झाल्यास ६ महिन्यात CPP साठी बेसिक चे बंधन हटविण्यात येइल, आणि सर्वांस पुर्ण CPP मिळेल.”

आपण CPP बाबतीत 40,000 बेसिक पे चं बंधन नसले पाहिजेत म्हणून व्यवस्थापनापुढे मोठ्या ताकदीने हा ज्वलंत मुद्दा ठेवला व त्याची फोड करून सांगितलं की, कशाप्रकारे कामगार बंधू आणि भगिनी पूर्ण CPP घेण्यास पात्र आहेत त्यांना सोसावी लागत असलेली आर्थिक झळ व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिली.

PEU ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे आणि त्यानुसार offshore मध्ये काम करणाऱ्या सर्वाना पूर्ण CPP मिळेल व त्यासाठी कोणत्याही बेसिक पे चे बंधन नसणार आहे.

दि.२५.०१.२४ पासुन PEU मान्यता प्राप्त झाली आहे , आणि दिलेल्या वचनानुसार ६ महिन्यांच्या आतच कामगारांच्या सदर समस्येचे यशस्वीरित्या निराकरण केले आहे.


  • संतोष ज. पाटील
    जनरल सेक्रेटरी
    पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन
    डब्लू.ओ.यु, ओ.एन.जी.सी,मुंबई🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय कामगार बंधू आणि भगिनींनो💐

आपणास माहीतच आहे की, आपल्या युनियनने मान्यताप्राप्तीच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाचा असा विजय मिळवला आहे. “काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले मान्यताप्राप्तीच्या पुष्टीकरणाचे पत्र(Recognition Letter) मा. कामगार मंत्रालयाच्या स्वाक्षरी सहीत आज दिनांक. २४.०१.२०२४ रोजी आपल्याला प्राप्त झाले आहे” हा आपल्या सर्वांकरीता आनंदाचा क्षण आहे. हा विजय युनियनमधील आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्न, मेहनत आणि समर्पणाचे फळ आहे. या यशाच्या निमित्ताने आपण सर्व, कामगारांच्या हितासाठी एकत्रित येऊन मजबूत रित्या काम करण्याचा संकल्प करू.

मान्यताप्राप्ती बाबत आपल्या कडे कामगार कायद्यानुसार २ वर्षे व ओ.एन.जी.सी च्या पॉलिसी नुसार १ वर्ष (२+१)असे मिळून तीन वर्षे आपल्याला कामगार हितासाठी काम करायला मिळणार आहेत.

कामगाराच्या कल्याण व सर्वोतोपरी हिताच्या मोहिमेत आपल्या सगळ्यांचा पाठिंबा आणि सहकार्य असेच भेटत राहो जेणेकरून आपल्या युनियनची ताकद वाढेल व पुढील येणाऱ्या सर्व अडचणींवर आपण संघटीतपणे मात करू व यश संपादन करू. मिळवलेल्या यशाबद्दल आपल्या सगळ्यांचे अभिनंदन आणि सर्वांचे आभार.

धन्यवाद…🙏🏻

संतोष ज. पाटील
जनरल सेक्रेटरी
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
ओ.एन.जी.सी, मुंबई.🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on