This is the new official website of PEU, Mumbai. Petroleum Employees Union,Mumbai is the recognized union of employees working in Mumbai region this is the official website of the Petroleum Employees Union,Mumbai.PEU Mumbai & KS Mumbai i.e. Karmachari Sanghatana are the 2 unions present in Mumbai region.
२१ दिवस ऑन-ऑफ ड्युटी पॅटर्न बद्दलच्या गंभीर विषयावर डेप्युटी चीफ लेबर कमिशनर यांच्या आदेशानुसार इंडस्ट्रीयल डिस्प्युट ऍक्ट १९४७ च्या ३३A कलमांतर्गत सदर प्रकरण प्रलंबित असतांना व्यवस्थापन दबावतंत्राचा उपयोग करत ऑफ़शोअर एम्प्लॉईजना २१ दिवस ड्युटी करण्यास जबरदस्ती करत आहे.
मागील बैठकीत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन व इतर कलेक्टिव्ह यांनी व्यवस्थापनेला संयुक्तिकरित्या आवाहनपत्र दिले होते त्यानंतर देखील व्यवस्थापन दबावतंत्राचा वापर करत आहे त्या अनुषंगाने पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे धोरण व पुढील दिशा खालील प्रमाणे असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी..
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, मान्यताप्राप्त युनियन, डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई
२१ दिवसांच्या on/off संदर्भात सध्याच्या घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आज दि. १५.०६.२०२४, रोजी रात्री ठीक ०८:४५ वाजता पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन आपल्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सविस्तर चर्चा करणार आहे, याकरीता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जास्तीत जास्त प्रमाणत एकाच ID वरून जॉईन करण्याचा प्रयत्न करा…!
आज २१ दिवस ऑन-ऑफ ड्युटी पॅटर्न बाबतच्या ज्वलंत प्रकरणावर पुढील दिशा व धोरण यावर चर्चा करण्यासाठी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांची अंतर्गत बैठक पार पडली. काल दि. ०६.०६.२०२४ रोजी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन द्वारे १४ दिवस पूर्ण झालेल्या कामगारांना उतरण्याबाबत जाहीरपणे प्रसारित करण्यात आलेल्या आवाहनपत्रा(NOTICE) नंतर काही इन्स्टॉलेशन वरून सकारात्मक कृती झाल्यात व १४ दिवस पूर्ण झालेल्या कामगारांना उतरविण्यात आले परंतु त्याची स्पष्टता देण्यात आलेली नाही.
आज पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन आणि सर्व COLLECTIVES यांची संयुक्त बैठक पार पडली बैठकी दरम्यान चारही कलेक्टिव्ह युनियननी १४ दिवस पूर्ण झालेल्या कामगारांना तात्काळ उतरविण्यात यावे या करिता संयुक्तिकरित्या आंदोलन करण्याचे ठरवीत त्याबाबतची पूर्वकल्पना ED-HRO यांना देण्यात आली. ED-HRO यांच्याबरोबर चर्चे दरम्यान ED-HRO यांना JOINT APPEAL देखील देण्यात आले, त्यानंतर चारही कलेक्टिव्ह यांनी ED-HRO यांना पुढील दिशा व धोरणाबाबत कल्पना दिली असता “मला हायर मॅनेजमेंट बरोबर चर्चा करावी लागेल” असे ED-HRO यांच्याकडून सांगण्यात आले.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन आज ही तिच्या भूमिकेवर ठाम आहे २१ दिवसाची जुलमी व एकतर्फी ऑफिस ऑर्डर रद्द झालीच पाहिजेत अगर असे होत नसेल तर आपली युनियन तिचे ठरलेले धोरण मार्गिकृत करेल असा इशारा बैठकी दरम्यान देण्यात आला. पुढील धोरण आणि दिशा आपल्याला लवकरच कळवण्यात येईल.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, मान्यताप्राप्त युनियन, डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई