ऑफशोअर मध्ये कार्यरत बंधू आणि भगिनींनो,

दिनांक २०/०२/२०२५ रोजी आस्थापना कडून पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन ला मान्सून प्रीपेअरडनेस मीटिंग करिता बोलवण्यात आले होते.

या मीटिंग मध्ये मान्सून मध्ये येणाऱ्या समस्यां बाबत चर्चा झाली. मान्सून मध्ये असणारे OVER POB, MINIMISATION OF CONTRACT DURING MANSOON, FOODBOX, PPE याचबरोबर COVID काळामधिल प्रलंबित OT व मागील मान्सून काळा मधील २०सप्टेंबर नंतरचा प्रलंबित OT याबाबत देखील चर्चा झाली. त्याचबरोबर SAFETY संदर्भातील विवध प्रलंबित विषयांवर आपण यापूर्वी दिलेल्या पत्र बाबत पाठपुरावा म्हणून लवकरच एक मीटिंग आयोजित करण्याचे देखील सर्वानुमते ठरविण्यात आले.

याच मीटिंग मध्ये मान्सून काळामध्ये १४ ऐवजी २१ दिवस ड्युटी करण्या करिताचा प्रस्ताव आस्थपनेकडून मांडण्यात आला याला पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन कडून ठाम विरोध दर्शवण्यात आला व आपल्याला कोणत्याही प्रकारची CHANGE OF SERVICE CONDITION आपल्याला मान्य नसल्याचे ठामपणे सांगण्यात आले.*

त्याचबरोबर मागील काळातील २१ दिवसांच्या जाचक duty मुळे उद्भवलेल्या विविध समस्या जसे ADVERSE WEATHER CONDITION मुळे CREW CHANGE CANCELLATION आणि त्यामुळे २१ ऐवजी जवळ जवळ २८ दिवसांपेक्षा जास्त duty करावी लागल्याचे तसेच FINANCIAL BENEFIT चा बाबतीत मिळालेले ५००० रुपये हे देखील अन्यायकारक असून आपल्याला मान्य नसल्याचे व त्यासदर्भात मा. कामगार आयुक्त यांच्या दालनात ठरलेल्या मुद्द्यांना आस्थापना ने पायदळी तुडवल्याचे आपण दाखवून दिले व त्याकरिता आपल्या पत्रा अन्वये DISPUTE RAISE केला आहे त्यामुळे आत्ता अशा कोणत्याही प्रकारच्या चेंज ऑफ सर्विस कंडिशन साठी आपली संमती नसून ठाम विरोध असल्याचे आपण मांडले.

त्यानंतर हेडक्वार्टर वरून दबाव येत आहे असे सांगून अस्थापणेकडून आपल्याला पुन्हा मीटिंग करिता बोलवण्यात आले, HRO श्री गोयल साहेब यांच्या समक्ष झालेल्या या मीटिंग मध्ये देखील मागील अनुभवाचा दाखला देत पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन ने आपला विरोध दर्शविला तसेच १४ दिवसांवर होणाऱ्या कोणत्याही कामासाठी mines act मध्ये दिलेल्या guidelines follow कराव्या लागतील त्याचप्रमाणे ओव्हरटाईम द्यावाच लागेल हे ठामपणे सांगितले.

पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन
WOU, मुंबई.

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.