ऑफशोअर स्थित,
प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो,

आपणास माहीतच आहे, की ऑफशोअरच्या एम्प्लॉईजनीं कोविड-१९ दरम्यान १४ दिवसाच्या वर ओव्हरटाईम केला होता. त्यामधील ०७ दिवसांचा ओव्हरटाईम आपणास अद्याप मिळालेला नसून त्याबाबतची कन्सिलेशन प्रोसेस मा. लेबर कमिशनर यांच्या कोर्टात चालू आहे. हक्काचा ओव्हरटाईम मिळालाच पाहिजेत याची जाणीव ठेवून पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन आस्थापनेसोबत लढत आहे.

सदर विषयाला धरून दि. ०६.०१.२०२५ रोजी मा. लेबर कमिशनर साहेब यांच्या दालनात मिटिंग पार पडली, चर्चेअंती ओएनजीसी आस्थापनेला १४.०१.२०२५ पर्यंत प्रलंबित व न दिलेला ओव्हरटाईम संदर्भात उत्तर मागितले आहे. या संदर्भात अंतिम तारीख म्हणून दि. १४.०१.२०२५ देण्यात आली असून अंतिम निर्णय त्याच दिवशी लागणार.

दि. १४.०१.२०२५ रोजी FOC झाल्यास पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन पुढील दिशा ठरवणार असून या बाबतची माहिती आपणास कळवण्यात येईल.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आपल्या तिनही ऑफिस मध्ये कामगारांसाठी ATM मशीनची सुविधा असली पाहिजेत या दृष्टिकोनातून पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने व्यवस्थापनासोबत झालेल्या मिटिंग दरम्यान आपल्या अजेंडा पॉईंटमध्ये याबाबत मुद्दा उचलून त्याबाबतची चर्चा केली होती.

आपल्याला सांगतांना आनंद होत आहे, की पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने तीनही कार्यालयात ATM मशीनच्या उपलब्धतेबाबत उपस्थित केलेल्या मुद्यावर व्यवस्थापनाकडून सकारात्मकता दाखवण्यात आली होती. आज रोजी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून ११ हाय, एनबीपी ग्रीन हाईट बिकेसी येथे HDFC बँकेचे ए.टी.एम (ATM) मशीन बसविण्याचे कार्य चालू झाले असून, वसुधारा भवन येथील ATM मशीन बसविण्याचे कार्य थोड्याच दिवसात चालू होईल व येत्या काही दिवसांतच तीनही कार्यालयातील सुविधाजन्य असे ATM मशीन वापरात येणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on