प्रिय बंधू आणि भगिनींनो,

२१ दिवसांच्या जाचक ऑफशोअर “ऑन-ऑफ ड्युटी” विरोधात पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन सातत्याने संघर्ष करत आहे. सदर प्रकरण कामगार न्यायाधिकरण (CGIT) मध्ये रेफर झाली आणि त्याच दरम्यान न्यायाधीशांनी राजीनामा दिला परिणामी पुढील सुनावणी तहकूब झाली.

हा विषय लांबणीवर पडू नये व आपल्या बांधवांना तातडीने न्याय मिळावा म्हणून, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने थेट मुंबई उच्च न्यायालयाद्वारे जाण्याचा निर्णय घेतला, परंतु उच्च न्यायालयाला महिनाभराची सुट्टी असल्याने आपल्याला नाईलाजास्तव वाट पाहावी लागली.

मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या सुट्टीचा काळ संपताच पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने त्वरित न्यायायालयात धाव घेतली. त्याअनुषंगाने आज दिनांक ०१ जुलै २०२५ रोजी, २१ दिवसांच्या ड्युटी पॅटर्न विरोधातील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पार पडली.

सुनावणी दरम्यान, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या वकिलाने कायद्याच्या चौकटीत दमदार युक्तिवाद सादर केला आणि ओएनजीसी व्यवस्थापनास अडचणीत टाकले.

मा. न्यायालयानेही या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत सुनावणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

सदर सुनावणीत प्रतिवादी असलेल्या ओएनजीसी व्यवस्थापनाने, न्यायालयाचा सकारात्मक रोख लक्षात घेता आपलं उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी मागितला. न्यायालयाने ती विनंती मान्य करत पुढील सुनावणीची तारीख १५ जुलै २०२५ निश्चित केली आहे.

ही लढाई केवळ एका ड्युटी पॅटर्नविरोधात नाही,
ही लढाई कामगारांच्या हक्कांची, सन्मानाची आणि अस्मितेची आहे!

आता प्रत्येक सदस्याने जागृत राहून संघटनेच्या पाठीशी ठाम उभं राहणं गरजेचं आहे. कारण संघर्ष जितका मोठा असतो विजय तितकाच ऐतिहासिक ठरतो!

कामगार एकता जिंदाबाद!

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन, डब्ल्यू.ओ.यु,ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आपल्या २१ दिवसांच्या अन्यायकारक ड्यूटी विरोधातील कायदेशीर चालू घडामोड बद्दल माहिती देण्यासाठी.*
तसेच अस्थापने कडून सेफ्टी च्या वारंवार करण्यात येणाऱ्या दुर्लक्षा विरोधात आपण दिलेल्या स्ट्राइक नोटिस संदर्भात व इतर महत्वाच्या विषयांवर पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यासाठी दिनांक २९/६/२०२५ संध्याकाळी ९ वा. वीडियो कॉन्फरन्सिंग चे आयोजन करण्यात आली आहे. पुढील link वर क्लिक करून आपण meeting join करू शकता:

https://meet.google.com/nhn-ahjm-crb

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on

STRIKE NOTICE

Strike call from Team PEU @ All work station in WOU.

Starts from: 9th July 2025

For issues:-

Unsafe Conditions at Mumbai Offshore, PPE , irregular supply of Foodbox, pathetic living conditions, shortage of manpower and Implementation of O&M at Ongc Core Activities.

Support: Support: Support

-Team PEU

Posted in Uncategorized | Comments Off on

बंधू आणि भगिनींनो

मेडिकल बिल मधील स्पेशल क्लेम करण्याकरिता ओएनजीसी डॉक्टरचे सर्टिफिकेशन गरजेचे असल्याची अट असल्याचे टीपीआयकडून सांगण्यात येत होते तसेच प्रलंबित बिल त्यासंदर्भात आज इंचार्ज मेडिकल व इन्चार्ज HR ER यांच्याबरोबर मीटिंग करून समस्या मांडण्यात आली ज्यावर यापुढे सदर सर्टिफिकेशन ची अट रद्द करण्यात आली आहे व TPI ला योग्य ते निर्देश देण्यात येतील हे स्पष्ट करण्यात आले. तसेच प्रलंबित बिले देखील लवकरच क्लियर करण्याचे मान्य केले.
सदर मिटींगला जनरल सेक्रेटरी श्री संतोष पाटील साहेब श्री दत्ता तावडे व श्री विलास फडके उपस्थित होते.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
WOU,ओएनजीसी
मुंबई.

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on