मित्रांनो,

नाशिक, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजी नगर येथील कर्मचार्‍यांना credit नोट वरून औषधे मिळण्यास गेल्या काही काळापासुन अडचणी येत होत्या.

यासंदर्भात, पेट्रोलियम एम्प्लाईज युनियन चे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव लवेकर साहेब यांनी आज दि. २१.०९.२६ रोजी तत्परतेने मेडीकल इंचार्ज श्री. शेणॉय सरांची भेट घेऊन त्यांना या समस्येची जाणिव करून दिली.

मेडिकल इंचार्ज यांनी याबाबत हेलिबेस येथुन मेडीसीन रिक्वेस्ट सबमिट करून बेनिफिशरीच्या मोबाईल वर “ओटीपी ” येइल, व अपोलो फार्मसी होम डिलिवरी करेल असे सांगितले.

  • काही तांत्रिक कारणांमुळे हेलिबेस येथे सदर सिस्टीम चालु नसून ती लवकरच हेलिबेस येथे कार्यरत होईल. हेलिबेस मधील सिस्टीम कार्यरत होई पर्यंत डॉ. संजय कावन( Dr. Sanjay Kawan-02244105103, 7574826747) यांच्याशी संपर्क साधुन मेडीसीन रिक्वेस्ट सिस्टम मध्ये सबमिट करून , मेडीसीन ची होम डिलिव्हरी मिळवता येइल असे मेडीकल इंचार्ज श्री. शेणॉय सरांनी सांगितले आहे.

पेट्रोलियम एम्प्लाईज युनियनने कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीप्रमाणे तातडीने पावले उचलत सदर समस्या सोडविली आहे.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन
मान्यताप्राप्त युनियन
डब्ल्यू.ओ.यु., ओएनजीसी, मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.