[blink] New [/blink]

🚩मित्रहो,🚩

ऑफशोर तसेच प्लांट्स मधील ओव्हर टाईम मिळण्याबाबच्या विषयावर कामगारांच्या मागे खंबीरपणे उभी राहून त्यानंतर मा.लेबर कमिशनर यांच्या दालनात दाद मागण्याकरिता प्रथम पोहोचणारी पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन आहे तसेच त्यानंतरही मागणीचा पाठपुरावा आपण सुरु ठेवला आहे.

याच संदर्भात दिनांक. १८/१०/२०२१ रोजी मा.लेबर कमिश्नर यांच्या दालनामध्ये पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन व ONGC आस्थापना यामध्ये ऑफशोर व ऑनशोर मधील OT संदर्भात कॉउंसिलिंग झाली त्याकरिता पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन तर्फे श्री संतोष ज पाटील साहेब (GS -PEU ) तसेच श्री दत्ता तावडे (SEC)उपस्थित होते.

या मीटिंग मध्ये श्री संतोष पाटील साहेब यांनी RLC यांच्या समोर पुन्हाएकदा स्पष्ट केले कि ओव्हरटाईम चा विषय हा सध्या असलेल्या ऑर्डर्स आणि CIRCULARS यांच्या आधारावरच HQ ला न पाठविता लोकल लेवल वर क्लिअर करायचा होता आणि त्या आधारेच लोकल MANAGEMENT ने काम करून आता जो ऑफशोर मधील 14 दिवसांवरील OT रोखून ठेवण्यात आलेला आहे तो व प्लांट मधील OT देखील लवकरात लवकर क्लिअर करावा.

ऑफशोर मधील 14 दिवसांवरील उर्वरित OT संदर्भात तसेच उरण मधील 8 तासांवरील OT संदर्भातील”या मीटिंग मध्ये आस्थापनेला आपला REPLAY FILE करून ऑफशोर व उरण मध्ये BILATERAL मीटिंग करण्याचे व त्याचा तपशील पुढील दि. 10/11/2021 रोजीच्या मीटिंग मध्ये देण्याचे निर्देश RLC ने दिले आहेत.

आपण आपली बाजू अभ्यासपूर्ण पाठपुरावा करून खंबीरपणे मांडली आहे.

संतोष ज पाटील
GENERAL SECRETARY

🚩🚩पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन, मुंबई🚩🚩

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.