प्रिय कामगार बंधू आणि भगिनींनो,

“व्यवस्थापनाच्या मुजोरीविरुद्ध पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचा लढा !!

वेधन सेवा (Drilling Services) विभागामध्ये आस्थापनेने घेतलेल्या जाचक आणि मनमानी निर्णयांविरुद्ध आज पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने ११ हाय येथील ड्रिलिंग विभाग कार्यालयात धडक देत ठाम उपस्थिती नोंदविली. युनियनचे ज्येष्ठ नेते आणि खंबीर कार्यकर्त्यांच्या सामूहिक आवाजाने व्यवस्थापनाला जाब विचारला आणि स्पष्ट इशारा दिला.

या वेळी ED-HDS व LMDS यांच्यासोबत व्यवस्थापनाच्या मुजोरीबाबत सखोल व थेट चर्चा झाली. युनियनला सहभागी न करता घेतले जाणारे निर्णय हे केवळ कामगारविरोधी नाहीत तर कामगारांच्या विश्वासार्हतेवर घाला घालणारे आहेत, हे ठामपणे सांगण्यात आले. व्यवस्थापन कामगारांच्या हिताशी खेळ करत आहे, आणि अशा धोरणांचा जाहीर निषेध तसेच तीव्र विरोध पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन करत राहील, हे स्पष्ट करण्यात आले.

याशिवाय आस्थापनेतील अनेक पूर्वप्रलंबित विषयांवरही युनियनने कठोर भूमिका मांडली. दरम्यान, ED-HDS तसेच LMDS यांनी शक्य ती सकारात्मक कारवाई लवकरात लवकर केली जाईल, अशी हमी दिली.

मात्र युनियनने व्यवस्थापनाला ठाम बजावले आहे की –
कामगारविरोधी धोरणे,
जाचक ऑर्डर्स आणि एकतर्फी निर्णय,
कामगारांच्या हक्कावर घाला कधीही सहन केला जाणार नाही.

कामगारांचा घाम, त्यांचा सन्मान आणि त्यांचे हक्क यांच्यावर कुठलीही गदा आणली, तर पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन रस्त्यावर उतरून या हिटलरशाही विरोधात निर्णायक लढाई लढण्यास तयार आहे!

कामगार एकता जिंदाबाद!
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन जिंदाबाद!!

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on