प्रिय बंधू आणि भगिनींनो,
आपणास माहीतच आहे की, व्यवस्थापन मॉन्सून दरम्यानच्या काळात ऑफ़शोअरच्या १४ दिवस ऑन-ऑफ ड्युटी पॅटर्नला बदलवून २१ दिवस ऑन-ऑफ ड्युटी पॅटर्न करण्याच्या मनसुब्यात आहे.
याद्वारे सातत्याने कामगारांवर अन्यायकारक धोरणं लादण्याचा प्रयत्न करु पाहणाऱ्या व्यवस्थापना विरोधार्थ पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन संप पुकारण्याच्या तयारीत असतांना मा. कामगार आयुक्त यांच्या येथे सदर विषयावर सुनावणी चालू आहे, याबाबत आतापर्यंत झालेल्या सर्वच घडामोडी आपल्याला कळवील्या आहेतच.
मागील दिनांक ०९/०४/२०२५ च्या मीटिंग मध्ये आपण केलेल्या कडाडून विरोधामुळे मागील कन्सिलेशन हे अनिर्णयित राहिले व मा. आर.एल.सी साहेब यांच्या विनंतीनुसार आपणा या पुढील मिटिंग मध्ये म्हणजेच आजच्या मीटिंग मध्ये आपला प्रस्ताव व्यवस्थापनेला कळवू असे सांगितले होते.
आज दिनांक १५ एप्रिल, २०२५ रोजी मा. कामगार आयुक्त साहेब यांच्या दालनात पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन व व्यवस्थापन यांच्यात कन्सिलेशन मिटिंग पार पडली असता, युनियन तर्फे १४ दिवस ड्युटी पूर्ण झाल्यानंतर व्यवस्थापन कामगारांना Operational Requirement पध्दतीवर १४ दिवसांपुढील दिवसांचा ओव्हर टाईम देणे मान्य करत असल्यास किंवा प्रति शिफ्ट एक लाख रुपये नुसार मोबदला देण्यास मान्य होत असेल तर आम्ही विचार करू असे ठाम मत मांडत खंबीरपणे आपली बाजू ठेवण्यात आली.
दरम्यान व्यवस्थापनातर्फे, आम्हाला पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने आणलेल्या प्रस्तावावर विचार करण्यासठी व आमचा प्रस्ताव मांडण्यासाठी वेळ देण्यात यावा म्हणून पुढील तारीख मागितली.
मा. कामगार आयुक्त साहेब यांच्या तर्फे दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतला व पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने त्यांचा प्रस्तावित संप १५ दिवस पुढे ढकलावा अशी विनंती ठेवण्यात आली.
मा. कामगार आयुक्त यांनी सुचवल्याप्रमाणे व ठेवलेल्या विनंतीस मान देऊन पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तिचा प्रस्तवित संप १५ दिवस पुढे ढकलत आहे तसेच यापुढील सुनावणी दी. २४.०४.२०२४ रोजी ठेवण्यात आली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी..!
धन्यवाद..!!
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ. यु, ओएनजीसी, मुंबई