Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण जगत असतांना आपल्या प्रकृतीची काळजी करणं आवश्यक आहे. वेळ सांगून येत नाही म्हणून, प्रसंगी आपल्या वर्क सेंटरला Emergency Service म्हणून एक रुग्णवाहिका(Ambulance) असणं गरजेचं आहे.

याच विचारातून पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने प्रत्येक वर्क सेंटरला एक रुग्णवाहिका असली पाहिजेत हा विचार व्यवस्थापनाकडे मांडला. सदर विषयावर चर्चा करत असतांना सदरची गरज व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिली व विषयाचा पाठपुरावा केला.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळालं असून, आणीबाणी सेवा (Emergency Service) म्हणून एक रुग्णवाहिका(Ambulance) ग्रीन हाईट येथे तात्काळ सेवेसाठी २४×७ उपलब्ध राहणार आहे.
याची सर्वांनी नोंद घ्यावी..!

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

ऑफशोर स्थित,
प्रिय बांधवांनो,

कोविड-१९ दरम्यानच्या प्रलंबित ओव्हरटाईम बाबत काल दि. २९.०१.२०२५ रोजी मा. सहा.कामगार आयुक्त साहेब यांच्या कार्यालयात व्यवस्थापना बरोबर चर्चा पार पडली.

सदर चर्चे दरम्यान मागील मीटिंग प्रमाणे कोणतीही चर्चा आस्थपनेबरोबर झाली नसल्याचे आपण निदर्शनास आणून दिले त्यावेळी व्यवस्थापनाने पुढील तारीख मागण्याचा प्रयत्न वजा विनंती केली परंतु पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियने पुढील तारखेवर भाष्य न करता आपला कामाचा मोबदला हा आपला वैधानिक अधिकार(STATUTORY RIGHTS) आहे व तो आपल्याला व्याजा सकट मिळालाच पाहिजे चालू असलेली दिरंगाई आपल्याला मान्य नसून देय असलेला हक्काचा ओव्हरटाईम मिळालाच पाहिजेत असे ठणकावून सांगितले.

दरम्यान मा. सहा.कामगार आयुक्त यांनी सदर प्रलंबित देय ओव्हरटाईम legal claim raise करून आपल्याला त्याची संपूर्ण प्रत पाठवावी व त्याप्रमाणे त्याची पडताळणी करून व पुढील प्रक्रिया करून Payment of Wages नुसार समन्स जारी करण्यात येईल असे कळविले आहे.

त्यानुसार प्रलंबित ओव्हरटाईम बाबतचे सदर काळातील क्लेम फॉर्म मा. कामगार आयुक्त साहेब यांच्या कार्यालयात लवकरात लवकर जमा केल्यानंतर त्यावर समन्स जारी करून पुढील कारवाई करण्यात येईल.

त्याअनुषंगाने आपण सर्वांनी आपापले कोविड-१९ दरम्यानच्या (२३ मार्च, २०२० ते १० एप्रिल, २०२१) ड्युटी पिरियड मधील १५ ते २१ दिवस ड्युटीचे प्रलंबित देय असलेले ओव्हरटाईम फॉर्म लवकरात लवकर पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी..!

टीप:आपण क्लेम करीत असलेल्या ०७ दिवसांमध्ये आपण जर १२ तासाच्या वर ड्युटी केली असेल व त्याचा ओव्हरटाईम आपणास मिळाला असेल तर तसे नमूद करावे.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on