

प्रिय बंधू आणि भगिनींनो,
आपणास ठाऊकच आहे की, कोविड-१९ कालावधीतील (२३ मार्च २०२० ते १० एप्रिल २०२१) प्रलंबित ओव्हरटाईम क्लेम संदर्भात पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनमार्फत कामगार आयुक्त कार्यालयात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
पूर्वीही यासंदर्भात आपल्या ओरिजिनल ओव्हरटाईम क्लेम फॉर्म युनियन कार्यालयात सादर करण्याबाबत सूचना देण्यात आली होती. मात्र अजूनही काही कामगार बांधवांचे फॉर्म युनियनकडे प्राप्त झालेले नाहीत.
टीप:
आपण जे ७ दिवसांचे क्लेम करत आहात त्यात जर एखाद्या दिवशी १२ तासांहून अधिक ड्युटी घेतली असेल आणि त्याचा काही भाग आधी मिळाला असेल, तर कृपया ती माहिती फॉर्मवर स्पष्ट नमूद करावी.
म्हणून स्पष्ट सूचित करण्यात येत आहे की:
आपले वैयक्तिक ओव्हरटाईम फॉर्म ३१ जुलै, २०२५ पर्यंत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन कार्यालयात
किंवा युनियनच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांकडे अवश्य जमा करावेत.
⚠️ ३१ जुलै २०२५ नंतर आलेले कोणतेही फॉर्म लेबर कोर्टाद्वारे ग्राह्य धरले जाणार नाहीत.
हा ओव्हरटाईम आपला कायदेशीर हक्क आहे. तो मिळवण्यासाठी आपल्याला प्रक्रियेतून जायला लागणार आहे. यासाठी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे ओव्हरटाईम फॉर्म वेळेत सादर करून युनियनला सहकार्य करावे.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी,मुंबई
प्रिय बंधू आणि भगिनींनो,
आपला २१ दिवसांच्या अन्यायकारक ड्युटी पॅटर्नविरोधात व्यवस्थापनासोबत कायदेशीर लढा सुरू आहे. या लढ्याच्या अनुषंगाने आजपर्यंतच्या घडामोडी आपणास समजावून सांगण्यासाठी, तसेच व्यवस्थापनाकडून वारंवार कामगारांच्या सुरक्षिततेकडे (Safety) करण्यात येणाऱ्या दुर्लक्षिततेविरोधात आपण दिलेल्या स्ट्राईक नोटीसबाबत आणि इतर महत्वाच्या विषयांवर पुढील कृतीविषयी चर्चा करण्यासाठी एक व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे.
✅ दिनांक: २३/०७/२०२५ ( बुधवार)
✅ वेळ: रात्री ०९:०० वाजता
खालील लिंकवर क्लिक करून आपण ऑनलाईन बैठकीत सहभाग नोंदवू शकता.
https://meet.google.com/cqa-umat-wgh
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई
प्रिय बंधू आणि भगिनींनो,
PEU चा दणका!!!!
डांगरी ( कॉटन कव्हरऑल) लवकरच मिळणार
आपणा सर्वांस माहितीच आहे की safety शी संबधीत PPE( डांगरी, शूज, हेलमेट, हँडग्लोव्ह्स, किट आणि लिव्हरीज यांच्या वितरणात झालेली प्रचंड दिरंगाई, फ़ूड बॉक्स करीता होत असलेला १०/१२ दिवसांचा विलंब, ऑफशोर मधील लिविंग कंडिशन ची दयनीय अवस्था ( फर्नीचर, बिल्डिंग मॉड्यूल) याचबरोबर खाजगी manpower, आणि खाजगीकरणासारख्या गंभीर विषयांवर पेट्रोलियम एम्प्लाईज युनियन ने दी. २५/०६/२०२५ पासून स्ट्राइक नोटिस दिली होती. यासंदर्भात मॅनेजमेंट ने दि.०१/०७/२५ रोजी पेट्रोलियम एम्प्लाईज युनियन च्या पदाधिकार्यांसोबत मिंटीग घेतली होती, यात सर्व विषयांवर सखोल चर्चा झाली. डांगरीज वेळेवर न दिल्याबद्दल PEU ने कडक शब्दांत निषेध नोंदवला होता, याची दखल घेत व्यवस्थापनाने तातडीची कार्यवाही सुरु केली असून लवकर च डांगरीज ( cotton coverall) बोर्ड परचेस च्या माध्यमाद्वारे खरेदी करण्यात येणार आहेत. *आपल्या पर्यत लवकरच डांगरीज पोहचतील. तसेच सर्व PPE items ही बोर्ड परचेस व्दारे घेता याव्यात यासाठी MCOD मध्ये हा विषय मांडून त्यावर मान्यता मिळावी याकरिता देखील प्रोसेस सुरू करण्यात आली आहे.
मित्रांनो, पेट्रोलियम एम्प्लाईज युनियन कामगारांच्या भल्यासाठी २१ दिवसांच्या ड्युटी पॅटर्न विरोधात न्यायालयीन लढाई, safety issues संदर्भातील लढाई, वेलफेयर issues मार्गी लावणे यासाठी युद्ध पातळी वर कार्यरत आहे. आपल्या सर्वांच्या साथीने लवकर च सर्व विषय मार्गी लागतील.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई
