Dear Colleagues,
(Offshore Employees)

As requested by P.E.U. in Last Week’s meeting with all concerned ED’s.
Tomorrow Friday 11.03.2022 Management has called for a meeting at V.Bhavan @ 13:00 hrs with P.E.U. to discuss discontinuing of the mandatory RTPCR test for Offshore Employees.

For information.

🙏Regards,
Santosh J. Patil
General Secretary
P.E.U.(W.O.U.)

Posted in Uncategorized | Comments Off on

कर्मचारी बंधु व भगिनींनो ,

काल दि.०३.०३.२०२२ रोजी हजिरा प्लान्ट येथे पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन चे जनरल सेक्रेटरी श्री. संतोष पाटील साहेब यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कामगारांतर्फे जनरल सेक्रेटरी साहेबांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. नंदकिशोर खानविलकर साहेब, श्री. सुरेश नन्नावरे साहेब , श्री. संदीप रेवंडकर साहेब उपस्थित होते.

कामगार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री. धनेश पटेल यांची हजिरा प्लांन्ट च्या PEU च्या नवीन सेक्रेटरी पदी सर्व सहमतीने निवड करण्यात आली.

याप्रसंगी PEU च्या पदाधिकाऱ्यांनी हजिरा प्लांन्ट चे प्लान्ट हेड ,HR- ER इ. हजिरा Management च्या प्रतीनिधींची भेट घेऊन कामगारांच्या प्रश्नांबद्दल चर्चा केली.

पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन, मुंबई🚩🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on

ओ.एन.जी.सी. पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन – उरण प्लांट व ओ.एन.जी.सी उरण प्लांटच्या संयुक्तं विद्यमाने शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित केलेल्या ३८व्या रक्तदान शिबिरामध्ये ७०२ रक्तदात्यांनी ह्या समाजउप्योगी थोर कार्यात रक्तदान करून सहयोग दिला.

ह्या रक्तदान शिबिरामध्ये पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी श्री. संतोष ज. पाटील, व्हाईस प्रेसिडेंट
श्री.सुरेश ननावरे,
डेप्युटी जनरल सेक्रेटरी श्री. संदीप रेवंडकर व
श्री. वैभव म. लवेकर, सेक्रेटरी उरण
श्री. समाधान मढवी, श्री.विलेश घरत,
व्हाईस प्रेसिडेंट – उरण श्री. इकुबल शेख आणि पेट्रोलियम एम्प्लॉईज यूनीयन तसेच जनरल एम्प्लॉइज असोसिएशन च्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.

सर्व सुज्ञ रक्त दात्यांचे मनपूर्वक आभार 🙏

ओ.एन.जी.सी उरण प्लांट प्रशासनाचे आभार 🙏

🚩 पेट्रोलियम एम्प्लॉईज यूनीयन, जिंदाबाद 🚩 🚩 जनरल एम्प्लॉइज असोसिएशन, जिंदाबाद 🚩

Posted in Uncategorized | Comments Off on

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंती व वसुधारा भवन येथील नवीन कार्यालयाच्या उद् घाटन सोहळ्याचे काही छायाचित्र:

Posted in Uncategorized | Comments Off on

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🏻वंदन आपल्या राजाला !🙏🏻

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंतीपेट्रोलियम एम्प्लॉयीज युनियन तर्फे
सोमवार दि. २१/०२/२०२२ रोजी ओ.एन.जी.सी., वसुंधरा भवन येथे सकाळी. ११:०० वाजता आयोजित करण्यात आलेली असून सर्वानी उपस्थित राहून या महासोहळ्याची शोभा वाढवावी.


यासोबतच आपल्या सर्वांकरिता आनंदाची बातमी,

आपल्या सर्वांच्या सुविधेकरिता पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन चे नवीन कार्यालय ओ.एन.जी.सी., वसुंधरा भवन, पहिला मजला, कार्यालय क्रमांक ११८ येथे सुरु करण्यात येणार आहे व त्याचे देखील उदघाटन याच शुभ प्रसंगी करण्यात येणार आहे तरी आपण सर्वानी उपस्थित राहून या दोन्ही सोहळ्यांचा भाग बनावे हि नम्र विनंती.

संतोष ज पाटील
जनरल सेक्रेटरी
🚩पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, (डब्लू.ओ.यु.) 🚩

Posted in Uncategorized | Comments Off on