PEU executive members from all rigs and platforms are requested to contact Mr.Santosh patil Sir and Mr. Sandeep Revandkar Sir for more details.

Posted in Uncategorized | Comments Off on

सहकारी बंधू आणि भगिनींनो..!

आज दि. ०५.०६.२०२४ रोजी डेप्युटी चीफ लेबर कमिशनर यांच्या कार्यालयात २१ दिवसाच्या ऑफिस ऑर्डर वर पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन आणि व्यवस्थापन यांच्या मध्ये कन्सिलेशन मिटिंग पार पडली.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तर्फे सदर ऑफिस ऑर्डर रद्दबातल व्हावी या भूमिकेवर ठाम राहून आस्थापनाने वेळोवेळी केलेल्या उल्लंघना बाबत मुद्दा ठेवण्यात आला दरम्यान डेप्युटी चीफ लेबर कमिशनर साहेबांकडून सूनवणीची पुढील तारीख मिळेपर्यंत सदर प्रकरणात ३३A लागू राहील ज्याप्रमाणे मा. LABOUR COMISSIONER यांच्या निर्देशाप्रमाणे १७/०५/२०२४ पूर्वीची परिस्थिती म्हणजे (१४दिवस on-off) स्थिती लागू राहील असे सांगण्यात आले.

आज झालेल्या कन्सिलेशन मिटिंगचा पूर्ण आढावा घेण्यासाठी आज दि. ०५.०६.२०२४, रोजी रात्री ठीक ०९:३० वाजता पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन आपल्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सविस्तर चर्चा करणार आहे करीता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जास्तीत जास्त प्रमाणत एकाच ID वरून जॉईन करण्याचा प्रयत्न करा…!

https://meet.google.com/dpd-dohb-awd

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो,

काल दि. ३१.०५.२०२४ रोजी डेप्युटी चीफ लेबर कमिशनर यांच्या कार्यालयात २१ दिवसाच्या ऑफिस ऑर्डर रद्दबातल करण्यासाठी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन आणि व्यवस्थापन यांच्या मध्ये कन्सिलेशन बैठक आयोजित केली होती.

दरम्यान झालेली चर्चा व युक्तिवाद त्यातून आपली पुढील दिशा काय असेल याचा आढावा घेण्यासाठी आज दि. ०१.०६.२०२४, रोजी रात्री ठीक ०९:३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे. याकरीता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जास्तीत जास्त प्रमाणत एकाच ID वरून जॉईन करण्याचा प्रयत्न करा…!

https://meet.google.com/yqi-pwfu-bjs

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on

सहकारी बंधू आणि भगिनींनो..!

आज दिनांक ३१.०५.२०२४ रोजी ठरल्या प्रमाणे २१ दिवस ऑन-ऑफ ड्युटी पॅटर्न ऑफिस ऑर्डर वरील सुनावणीबाबत डेप्युटी चीफ लेबर कमिशनर साहेब यांच्या कार्यालयात वरील विषयावर कन्सिलेशन बैठक पार पडली. सदर बैठकीत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या वतीने जनरल सेक्रेटरी श्री. संतोष पाटील साहेब, श्री सुरेश ननावरे साहेब(व्हाईस प्रेसिडेंट), श्री. संदीप रेवंडकर(डेप्युटी जनरल सेक्रेटरी), श्री. वैभव लवेकर(डेप्युटी जनरल सेक्रेटरी), श्री. श्रीनिवास आचार्य आणि व्यवस्थापनाच्या वतीने श्री. बी. सी. गोयल, श्री. बलियार सिंग, श्री. विवेक झिणे उपस्थित होते.

कन्सिलेशनच्या बैठकीत व्यवस्थापनाकडून आलेली ऑफिस ऑर्डर ही पावसाळ्यातील खराब हवामान लक्षात घेत कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन काढण्यात आली आहे व सदर ऑर्डर फक्त ३ महिण्यासाठीच असून ऑर्डर मध्ये दिलेल्या तारखेनंतर लागू राहणार नाही असे सांगण्यात आले.

दरम्यान पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन कडून गेली चाळीस वर्षे ते आजतागायत ऑफ़शोअर एम्प्लॉईज हे १४ दिवस ऑन-ऑफ ड्युटी पॅटर्न नुसारच कर्तव्य बजावत असतांना ही अन्यायकारक ऑफिस ऑर्डर काढण्यात काहीच अर्थ नाही व आता पर्यंत हेलिकॉप्टरच्या सगळ्याच दुर्घटना पावसाळ्यात झालेल्या नाहीत असे सांगण्यात आले सोबतच पावसाळ्यातील हेलिकॉप्टरची उड्डाणे हवामानाच्या अनुकूल/प्रतिकूल परिस्थितीला लक्षात घेऊनच DGCA तिच्या अखत्यारीत हेलिकॉप्टरांची उड्डाणे चालविते अगर थांबविते ही बाब देखील डेप्युटी चीफ लेबर कमिशनर साहेबांच्या लक्षात आणून दिली व आलेली ऑफिस ऑर्डर लवकरात लवकर रद्द करण्यात यावी या मतावर आपली ठाम भूमिका घेण्यात आली.

दरम्यान डेप्युटी चीफ लेबर कमिशनर साहेबांनी सद्यस्थितीत वरील विषयावर दोन्ही पक्षांनी संगनमताने तोडगा काढावा व सदर विषयात इंडस्ट्रियल दिस्प्युट ऍक्टचा ३३A नियम लागू असल्यामुळे आलेली ऑफिस ऑर्डर पुढील सुनावणी पर्यंत लागू करता येणार नाही असे सांगत पुढील सुनावणीसाठी दि. ०५.०६.२०२४ रोजी बोलावण्यात आले आहे.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on

मित्रहो,
काल दिनांक 29.05.2024 रोजी ,ज्वलंत विषयावर, म्हणजेच pending ओव्हर टाईम मिळण्याबाबत माननीय लेबर कमिशनर ऑफीस मध्ये ठरलेल्या वेळी ओ. एन. जी. सी.(आय. आर. सेक्शनचे ) पूर्ती साहेब तसेच आपले जनरल सेक्रेटरी संतोष पाटील साहेब, DGS श्री संदीप रेवंडकर साहेब यांच्या उपस्थितीत मीटिंग झाली.

14 दिवसांवरील (मार्च 2020 पासून ते एप्रिल 2021 पर्यंतचा)pending ओव्हर टाईम देखील 14 दिवसानंतरच मिळावा या आपल्या मागणी संदर्भात दि.09.07.2024 रोजी मा. लेबर कमीशनर यांच्याकडे मीटिंग आयोजित करण्यात आली आहे.

मीटिंग अंती मा. Assistant लेबर कमिशनर यांनी दिलेल्या निर्देशानुसार मॅनेजमेंट ला 9.07.2024 तारखेला येते वेळी अजून पर्यंत pending overtime का देण्यात आला नाही याचे सर्व कायदेशीर कारणे योग्य कागदपत्रांसह घेऊन येण्याचे निर्देश दिले आहेत.

पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन ने सदर विषयाबाबत आपली कणखर बाजू लेबर कमिशनर समोर मांडली ते तुमच्या असलेले पाठबळ आणि एकजूटी यामुळे आणि यापुढेही तुमचे योगदान व सहयोग युनियन सोबत असाच असावा ही विनंती

विजय आपलाच होईल.

कामगार एकता झिंदाबाद !!
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन झिंदाबाद !!

Posted in Uncategorized | Comments Off on