Post Date:- 07.11.2023

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो..💐

मागील ०५/१०/२०२३ रोजी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन व सहायक कामगार आयुक्त(Asst Labour Commissioner) यांच्या मध्ये कोविड-१९ दरम्यानचा ०७ दिवसाच्या बाकी असलेल्या ओव्हर टाइम बाबत कन्सिलेशन मिटिंग पार पडली होती. सदर मिटिंग झाल्यावर ALC कार्यालायाच्या निर्देशानुसार ओ.एन.जी.सी व्यवस्थापणेस पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन सोबत विचारविनिमय करून वरील बाब मार्गी लावण्यासाठी ०७.११.२०२३ रोजी मिटिंग घेण्या बाबत निर्देश देण्यात आला होता.

परंतु ALC च्या कार्यालयात कन्सिलेशन ऑफिसर या रिक्त पदाची नियुक्ती प्रक्रिया चालू असल्याने सदरील मिटिंग पुढे ढकलण्यात आली असून संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी दिनांक ०७.१२.२०२३ रोजी मिटिंग घेण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

संतोष ज. पाटील
जनरल सेक्रेटरी

पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन🚩🚩
ओ.एन.जी.सी, मुंबई..

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय सहकारी बांधवांनो💐

ठरल्या प्रमाणे आज दिनांक ०५/१०/२०२३ रोजी पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियनची सहायक कामगार आयुक्त (Asst. Labour Commissioner) यांच्या सोबत ऑफशोरच्या राहिलेल्या ०७ दिवसाच्या ओटीसाठी कन्सिलेशन मीटिंग पार पडली. ज्यामध्ये पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या वतीने जनरल सेक्रेटरी श्री. संतोष पाटील साहेब व जॉईंट सेक्रेटरी श्री. उमेश जमखंडे साहेब तर व्यवस्थापनाच्या बाजूने श्री. दानेश व पूर्ती उपस्थित होते. सदरहू मीटिंग मध्ये श्री. संतोष पाटील साहेबांनी कामगारांची बाजू खंबीरपणे मांडली आणि आपल्या कामगार हिताच्या मागणीवर ठाम राहून तशी चर्चा केली. तेव्हा सहायक कामगार आयुक्तांनी(ALC) व्यवस्थापनास ओव्हरटाईम हा कामगारांना द्यावाच लागेल हया संदर्भात आपण पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन सोबत बसून चर्चा व विचारविनिमय करून एकमताने निर्णय घेत सादर विषय मार्गी लावावा असा निर्देश देण्यात आला आहे. या अनुषंगाने येत्या ०७ नोव्हेंबरल,२०२३. रोजी पुन्हा सहायक कामगार आयुक्त (ALC) उपस्थितीत हा विषय निर्णयास लावू.

पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन झिंदाबाद, कामगार एकता झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय सहकारी बंधू-भगिनींनो💐

आपण नुकत्याच झालेल्या युनियनच्या मान्यताप्राप्तीच्या निवडणुकीत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या बाजूने भक्कमपणे उभे राहून आपल्या युनियनला विजयी केलं

निवडून आल्यावर पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने विजयाच्या जल्लोषात वाहून न जाता लगेचच कामगारांच्या कल्याणाची धुरा सांभाळत प्रत्येक जिल्ह्यात आपल्या कामगार बांधवांसाठी व गाव ठिकाणी वास्तव्यास असलेले आपल्या कामगारांवर अवलंबून असलेले त्यांचे आई-वडील यांच्या साठी Hospital Empanelment ची प्रक्रिया चालू केली आहे.

सदर प्रक्रियेत ऑनलाइन गूगल फॉर्म भरून घेता येईल. ज्याच्या माध्यमातून आपल्या युनियन कडे त्या-त्या जिल्ह्यातील कामगारांच्या संख्याबळाचा आणि त्यांच्या वर अवलंबून असलेल्या आई-वडील इ. ची माहिती गोळा होईल. त्याच माहितीच्या आधारे पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन व्यवस्थापनासमोर अचुकपणे आणि मुद्देसूदरित्या वरील विषय ठेवत कामगार कल्याणाची मशाल पेटवणार आहे.

करीता आपण खाली उपलब्ध करून देण्यात आलेल्या गूगल फॉर्मच्या संकेतस्थळावर क्लिक करून गूगल फॉर्म भरून सबमिट करावा असे आवाहन पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन करीत आहे👇🏻

https://forms.gle/Mm3wpxeLawYKf6XP6

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन जिंदाबाद…🚩🚩.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन
ओ.एन.जी.सी, मुंबई🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on