प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आपणास माहीतच आहे की, एम्प्लॉईजची मेडिकल बिल्स क्लेम करण्याची पद्धत बदलली असून, आता ती TPA मार्फत होत आहे. त्या अनुषंगाने व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी तिन्ही कार्यालयं आणि हेलिबेस येथे TPA हेल्पडेस्कची व्यवस्था केली आहे.

त्यानुसार हेलिबेस येथे TPA हेल्पडेस्कची व्यवस्था पहिल्या मजल्यावर करण्यात आली होती परंतु, TPA संबंधित समन्वयक असलेल्या व्यक्तीला दररोजच्या येण्या-जाण्यासाठी प्रवेश पास मिळत नसल्याने संबंधित समन्वयक व्यक्ती हेलिबेस येथे उपस्थित राहू शकत नव्हता, परिणामी TPA हेल्पडेस्क काम करू शकत नव्हते. पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने सदर विषयात भर घालून संबंधित समन्वयकाचा प्रवेश पास रेग्युलर करून घेतला त्यामुळे आजपासून कामगारांना सदरील TPA हेल्पडेस्कच्या व्यवस्थेची सेवा घेता येणार आहे.

TPA हेल्पडेस्कच्या कामकाजाची वेळ ही सकाळी ०९.३० ते ०५.३० अशी राहील व संपर्कासाठी 086019 41754 हा मोबाईल नंबर उपलब्ध असेल. ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी..!

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

|गुढीपाडवा उत्सव|
. मंगळवार, दिनांक ०१/०४/२०२५ रोजी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, वसुधरा भवन टीम तर्फे वसुधरा भवन येथे सकाळी ठीक ०८.४५ वाजता गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुढी पूजन व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल याची नोंद घ्यावी.

  • तरी आपण सर्वानी उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
    • पेट्रोलियम एम्प्लॉइस युनियन,
    • मान्यताप्राप्त युनियन,
    • डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी,मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on