सहकारी बंधू आणि भगिनींनो..!💐

युनियन तर्फे देण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार उद्या दि. २१.०५.२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता वसुधरा भवन येथे आपल्याला मोठ्याप्रमाणत उपस्थितीत राहावयाचे आहे. स्ट्राईक कॉल असल्याने प्रत्येकाने ड्रेस कोड फॉलो करावयाचा आहे. ड्रेस कोड मध्ये काळ्या रंगाचे शर्ट(Black Shirt)/ काळ्या रंगाची टीशर्ट(Black T-shirt) किंवा गडद रंगाचा ड्रेस(Dark colors dress) असणे आवश्यक आहे. कोणीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून येऊ नये अशी सूचना युनियन कडून करण्यात येत आहे कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी..

जो पर्यंत व्यवस्थापणेकडून आलेली ऑफिस ऑर्डर रद्दबातल होत नाही तो पर्यंत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तीच्या स्ट्राईक कॉल वर ठाम आहे व ती मागे सरणार नाही हे याद्वारे आपणास स्फूर्तपणे कळविण्यात येत आहे..!

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on

[blink] Slogans for program [/blink]

🏴🏴 STRIKE STRIKE STRIKE.. 🏴🏴

होय या अन्यायाविरोधात..!
होय या जाचक नियमाविरोधत..!
होय या हुकूमशाही विरोधात..!
होय चुकीच्या धोरणाविरोधात..!

आता नाही तर कधीच नाही..!!

सर्व कामगार बांधवांना विनंती जर आपण ऑफ मध्ये आहात तर मंगळवार, बुधवार व शुक्रवार स्वयंस्फूर्तीने ह्या एकाधिकारशाही लादू पाहणाऱ्या व्यवस्थापना विरोधात एकत्र या आणि आपल्यावर होणारा हा अन्याय मोडीत काढण्यासाठी आपण सर्व सामील व्हा..! या मुजोर व्यवस्थापनाला आपली जागा दाखवण्याची हीच अचूक संधी व वेळ आहे..!!!

सर्व मतभेद विसरा फक्त एकच लक्षात ठेवा आपला अधिकार..!!

जन आक्रोश..!👊
जन प्रक्षोभ..!!👊

आता फक्त एकच ध्येय, जन आंदोलन आपल्या हक्कासाठी..!!!

कामगार विरोधी व्यवस्थापने विरुद्ध होत असलेल्या ह्या जनआंदोलनात जास्तीत जास्त संख्येने कामगारांनी सहभागी व्हावे असे आव्हान पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन या द्वारे करते आहे..

🙏🏻पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन 🙏🏻
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई🚩🚩🚩🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on

बंधू आणि भगिनींनो,
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मान्यता प्राप्ती नंतर लगेचच ऑफशोअर आणि ऑनशोअर कामगारांच्या असलेल्या विविध समस्यांवर चर्चे करिता bilateral मीटिंग ची मागणी आपल्या पत्राद्वारे करण्यात आली होती.

आपल्या माहितीप्रमाणे जवळ जवळ १४ वर्षं अश्या प्रकारची मीटिंग यापूर्वी कधीच झाली नसल्याने आणि पहिल्यांदाच आपण अश्या प्रकारे मीटिंग केल्याबद्दल आस्थापनेचे देखील धाबे दणाणले.

आज दि.०४/०५/२०२४ रोजी WOU च्या सर्व KEY EXECUTIVES बरोबर ही बैठक संपन्न झाली, ज्यामध्ये श्री.C. MATHAVAN साहेब ED WOU Mumbai, श्री.V V प्रसाद ED CDS, श्री.अजय कुमार शर्मा ED ASSET MANAGER MH ASSET, श्री.रवी शंकर ED ASSET MANAGER B&S, श्री.अमित देसाई ED HDS, श्री.B C GOEL GGM HEAD RO MUMBAI, I/C MEDICAL श्री शेनॉय साहेब हे उपस्थित होते ज्यामध्ये आपल्या दिलेल्या ऑफशोअर मधील व वर्क सेंटर(ऑफिसेस) संदर्भातील SAFETY व इतर वेल्फेअर च्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

गेल्या १४ वर्षांमधील प्रलंबित असलेल्या विषयांवर अस्थपनेन आश्चर्य व्यक्त केले व आपल्या पत्रा मधील व इतर जवळ जवळ ८० विषयांवर सकारात्मक चर्चा करून विषय लवकरात लवकर सोडविण्याचे मान्य केले. तसेच झालेल्या सर्व विषयांवर लवकरच MINUTES प्रकाशित करण्यात येतील.

कामगार एकता जिंदाबाद!!!
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन जिंदाबाद!!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन व जनरल एम्प्लॉइज असोसिएशन आयोजित महाराष्ट्र दिन व कामगार दिन!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन व जनरल एम्प्लॉइज असोसिएशन तर्फे दि. ०१/०५/२०२४ रोजी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन सोहळा ११ हाय कार्यालय, तळ मजला ATRIUM, ONGC, सायन येथे सकाळी ठीक ११ वा. आयोजित करण्यात आला आहे.

आपल्या सर्वांची पारंपरिक पेहरावात उपस्थिती हीच आपल्या या कार्यक्रमाची शान आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या या एकजुटीचे आणि कामगारांच्या ताकदीचे दर्शन या कार्यक्रमाच्या स्वरूपात सर्वांना घडूद्या व त्याकरिता आपणा सर्वांना विनंती आहे आपण मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहवे व आपल्या मौल्यवान वेळ याकरिता द्यावा.

विशेष आकर्षण:
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पथक यांचे शिवकालीन साहसी खेळ.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन व जनरल एम्प्लॉइज असोसिएशन.
WOU, मुंबई.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on