प्रिय बंधू आणि भगिनींनो,

सध्याची ज्वलंत बाब म्हणजे व्यवस्थापन ऑफ़शोअरच्या ड्युटी पॅटर्न मध्ये बदल करू पाहत आहे. संदर्भित विषयावर आज दि. २४ एप्रिल, २०२५ रोजी मा. विभागीय कामगार आयुक्त (केंद्रीय) यांच्या कार्यालयात बैठक पार पडली.

दरम्यान पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने, आपण दिलेल्या प्रस्तावावर ठाम असून सदरचं अन्यायकारक धोरण कोणत्याही न्यायिक मोबदल्याशिवाय स्वीकाराहार्य नाही असे खंबीरपणे सांगितले. व्यवस्थापनाने दि. २२ एप्रिल, २०२५ रोजी ऑफ़शोअर ड्युटी पॅटर्न बदलण्या संदर्भातली एकतर्फी नोटीस काढून कामगारांवर लादली आहे सदरील विषय ९(ए) अंतर्गत मा. विभागीय कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात सुनावणीसाठी प्रक्रियाधीन असताना व्यवस्थापन ड्युटी पॅटर्न बदलण्याबाबतची धमकीयुक्त नोटीस अथवा असा प्रयोग करू शकत नाही अशी बाजू पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने बैठकी दरम्यान मांडली.

दरमान्य व्यवस्थापनाने २२ एप्रिल, २०२५ रोजी काढलेली नोटीस ही ९(ए) ला धरूनच काढली आहे व पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने आणलेल्या प्रस्तावावर किंवा मोबदल्याबाबत काय देऊ-घेऊ शकतो ह्यासंदर्भात आम्ही युनियन सोबत चर्चा करण्यास तयार आहोत असा युक्तिवाद केला.

दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेत, सदरील विषय मा. विभागीय कामगार आयुक्त(केंद्रीय) यांच्या कार्यालयात सुनावणी प्रक्रियेत असताना २२ एप्रिल, २०२५ रोजी व्यवस्थापनाने धमकीयुक्त नोटीस काढली त्याबाबत मा. कामगार आयुक्त यांनी व्यवस्थापनाला कानपिचक्या दिल्या व काढलेली नोटीस जर ९(ए) प्रमाणे आहे तर नोटीसी मध्ये कुठेही ९(ए) चा उल्लेख का नाही असा प्रश्न उपस्थित केला.

सदर विषय कामगारांवर अन्याय न होऊ देता त्यांना न्यायिक मोबदला देऊन संयमाने व सौहार्दपूर्वक रित्या निकाली काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजेत व त्यासाठी व्यवस्थापनाने शक्य तेवढ्या लवकर पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनला ओएनजीसी मुख्यालय, दिल्ली येथे चर्चेसाठी बोलावलं पाहिजेत असा सल्ला दिला.

सौहार्दपूर्वक वातावरणात सदर विषय निकाली काढण्यासाठी व पुढील कार्यवाही करिता दि. ०१ मे, २०२५ ही तारीख मा. विभागीय कामगार आयुक्त (केंद्रीय) यांच्या कडून देण्यात आली आहे.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो,

संभाजी नगर व आजूबाजूला राहणाऱ्या आपल्या कामगारांना वैद्यकीय सोयीसाठी संभाजी नगर येथे कोणतेही मोठे हॉस्पिटल ओएनजीसीच्या पॅनल वर नसल्याने त्यांना मुंबई किंवा पुणे येथे जावे लागत होते. हा विचार लक्षात घेता, मान्यता प्राप्ती नंतर संभाजी नगर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलला(Medicover Hospital) ओएनजीसी पॅनल वर घेण्यासाठी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन आपल्या त्या विभगातील कामगारांच्या सहकार्यासह व कसोशीने प्रयत्न करत होती.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या आपल्या बांधवांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मेहनतीला यश आले असून सदरची ऑर्डर मेडिकल सेक्शनच्या कार्यालयातून आज काढण्यात आली आहे. मेडिकव्हर हॉस्पिटलची सुविधा आपल्याला आजपासून घेता येणार आहे ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी..!!

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु,ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आपणास माहीतच आहे की, व्यवस्थापन मॉन्सून दरम्यानच्या काळात ऑफ़शोअरच्या १४ दिवस ऑन-ऑफ ड्युटी पॅटर्नला बदलवून २१ दिवस ऑन-ऑफ ड्युटी पॅटर्न करण्याच्या मनसुब्यात आहे.

याद्वारे सातत्याने कामगारांवर अन्यायकारक धोरणं लादण्याचा प्रयत्न करु पाहणाऱ्या व्यवस्थापना विरोधार्थ पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन संप पुकारण्याच्या तयारीत असतांना मा. कामगार आयुक्त यांच्या येथे सदर विषयावर सुनावणी चालू आहे, याबाबत आतापर्यंत झालेल्या सर्वच घडामोडी आपल्याला कळवील्या आहेतच.

मागील दिनांक ०९/०४/२०२५ च्या मीटिंग मध्ये आपण केलेल्या कडाडून विरोधामुळे मागील कन्सिलेशन हे अनिर्णयित राहिले व मा. आर.एल.सी साहेब यांच्या विनंतीनुसार आपणा या पुढील मिटिंग मध्ये म्हणजेच आजच्या मीटिंग मध्ये आपला प्रस्ताव व्यवस्थापनेला कळवू असे सांगितले होते.

आज दिनांक १५ एप्रिल, २०२५ रोजी मा. कामगार आयुक्त साहेब यांच्या दालनात पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन व व्यवस्थापन यांच्यात कन्सिलेशन मिटिंग पार पडली असता, युनियन तर्फे १४ दिवस ड्युटी पूर्ण झाल्यानंतर व्यवस्थापन कामगारांना Operational Requirement पध्दतीवर १४ दिवसांपुढील दिवसांचा ओव्हर टाईम देणे मान्य करत असल्यास किंवा प्रति शिफ्ट एक लाख रुपये नुसार मोबदला देण्यास मान्य होत असेल तर आम्ही विचार करू असे ठाम मत मांडत खंबीरपणे आपली बाजू ठेवण्यात आली.

दरम्यान व्यवस्थापनातर्फे, आम्हाला पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने आणलेल्या प्रस्तावावर विचार करण्यासठी व आमचा प्रस्ताव मांडण्यासाठी वेळ देण्यात यावा म्हणून पुढील तारीख मागितली.

मा. कामगार आयुक्त साहेब यांच्या तर्फे दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतला व पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने त्यांचा प्रस्तावित संप १५ दिवस पुढे ढकलावा अशी विनंती ठेवण्यात आली.

मा. कामगार आयुक्त यांनी सुचवल्याप्रमाणे व ठेवलेल्या विनंतीस मान देऊन पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तिचा प्रस्तवित संप १५ दिवस पुढे ढकलत आहे तसेच यापुढील सुनावणी दी. २४.०४.२०२४ रोजी ठेवण्यात आली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी..!

धन्यवाद..!!

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ. यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

बंधू आणि भगिनींनो,

पेट्रोलियम एम्प्लॉइस युनियनचे मान्यता प्राप्ती पासून सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून TENURE BASE एम्प्लॉइज चे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले WAGE REVISION आपल्या आस्थापना बरोबर झालेल्या मीटिंगमध्ये ठरलेल्या मिनिट्स प्रमाणे ०१/०१/२०२४ पासून मान्य करण्यात आले असून त्याची ऑर्डर आज दिनांक ११/०४/२०२५रोजी काढण्यात आली आहे आपल्या सर्वांचे पाठबळ आणि युनियनचे सततचा पाठपुरावा याचे हे यश असून आपल्या सर्व कामगारांना हे समर्पित.

धन्यवाद
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन
WOU,मुंबई.

Posted in Uncategorized | Comments Off on