This is the new official website of PEU, Mumbai. Petroleum Employees Union,Mumbai is the recognized union of employees working in Mumbai region this is the official website of the Petroleum Employees Union,Mumbai.PEU Mumbai & KS Mumbai i.e. Karmachari Sanghatana are the 2 unions present in Mumbai region.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन ने सातत्याने मागणी करून पाठपुरावा ठेवलेल्या CSSS या ONGC WALFARE SCHEME ज्यामध्ये आतापर्यंत आपल्याला मिळत असलेल्या कॉम्पेन्सशन मध्ये लवकरच वाढ करण्यात येत आहे.
तसेच कामगारांच्या ज्वलंत विषयांना वाचा फोडण्याकरिता असलेले फोरम JCM जानेवारी मद्ये आयोजित करण्यात येणार आहे. ( COVID परिस्थिती विचारात घेऊन)
त्याचबरोबर FALICITATION OF RETIRED EMPLOYEES SCHEME मध्ये देखील लवकरच वाढ करण्यात येणार आहे.
०४ ही युनियनच्या कंत्राटी कामगारांनी संपाला दिलेल्या उत्स्पूर्त प्रतिसादामुळे ओ.एन.जी.सी व्यवस्थापनाने त्याची दखल घेत आपल्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आपण हा संप तूर्तास मागे घेत आहोत.
मीटिंगचा सविस्तर वृत्तांत थोड्या वेळातच आपल्याला कळवण्यात येईल.
ऑफशोर मधील PANDEMIC काळातील आपल्या 14 दिवसांवरील OT CLAIM बाबत केवळ पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियननेच सुरवातीपासून पुढाकार घेतला आहे आणि आपल्या पाठपुराव्याला यशदेखील आले हे सर्वज्ञात आहे.
दि.18/10/2021 व दि 10/11/2021 रोजी मा.लेबर कमिशनर यांच्या दालनामध्ये झालेल्या काउंसिलिंग मध्ये आस्थापनेने वेळ मागून घेतला होता. त्यानंतर आता दि.02/12/2021 रोजी झालेल्या मीटिंग मध्ये आस्थापनेने “आपण सर्व OT एम्प्लॉयीसना दिला असल्याचे” वक्तव्य करण्याची घोडचूक करून कामगारांच्या मागणीपासून पाठपुरावा सोडवण्याचा प्रयत्न चालविला आहे. यावर पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने आपली बाजू ठामपणे मांडली आहे, तसेच “कोणत्याच एम्प्लॉयीसना संपूर्ण 14 दिवसांवरील OT मिळाला नसल्याचे आणि DRILLING आणि काही विभागांमध्ये तर 21 दिवसांवरीलदेखील OT देखील आजपर्यंत न मिळाल्याचे” प्रतिपादन आपण केले. यावर मा. लेबर कमिशनर यांनी पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन ला संपुर्ण OT न मिळालेल्या एम्प्लॉयीस ची यादी आस्थापनेला मा लेबर कमिशनर यांच्या मार्फत देण्यास निर्देश दिले आहेत. आपल्या सर्वाना विनंती आहे ज्या एम्प्लॉयीस ना 14 दिवसांवरील तसेच 21 दिवसांवरील कोणताही OT प्रलंबित असल्यास अश्या सर्व एम्प्लॉईजनी आपली नावे आपल्या INSTALLATION वरील पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन च्या प्रतिनिधींकडे ई-मेल द्वारे द्यावी तसेच रिग वरील एम्प्लॉईजनी खालील प्रति निधींकडे लवकरात लवकर द्यावीत. 1)श्री.निलेश कट्यारमल 7506723283 2)श्री.प्रेषित शेडगे 9969227864 3)श्री.सुधाकर होन 7875925168 4)श्री.कुणाल भागवत. 8446463960 5)श्री.उमेश जमखंडे 9967904137 6)श्री.शुभम आवळे 9969223374 तसेच यापुढील सर्व सुनावणी आपल्याला कळविण्यात येईल.
संतोष ज पाटील. जनरल सेक्रटरी, 🚩पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,🚩 🚩WOU मुंबई . 🚩