This is the new official website of PEU, Mumbai. Petroleum Employees Union,Mumbai is the recognized union of employees working in Mumbai region this is the official website of the Petroleum Employees Union,Mumbai.PEU Mumbai & KS Mumbai i.e. Karmachari Sanghatana are the 2 unions present in Mumbai region.
हॉटेल पार्ले इंटरनॅशनल येथे Quarantine असलेल्या आपल्या जवळ जवळ ३५-४० एम्प्लॉईस ना पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन च्या दि. ०२/०९/२०२० च्या पत्रव्यवहारामुळे तसेच त्यावर दि ०३/०९/२०२ च्या प्रत्यक्ष भेटीच्या योग्य वेळी दिलेल्या दणक्या मुळे आस्थापणाने सध्या हॉटेल पार्ले इंटरनॅशनल येथे असलेल्या जवळजवळ ३५-४० एम्प्लॉईस ना आधीच्याच हॉटेल मध्ये QUARANTINE करण्याचा निर्णय घेतला आहे आज संध्याकाळपर्यंत गाड्यांची व्यवस्था करून सर्व एम्प्लॉईस ना हॉटेल वर पाठवण्यात येईल.
आज दि ०३/०९/२०२० रोजी आपल्या दि ०२/०९/२०२० च्या HOTEL QUARANTINE च्या महत्वाच्या प्रश्नावरील LETTER संदर्भात तसेच इतर ज्वलंत विषयांवर पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन तर्फे ED HRO, ED-MH ASSET, ED- B&S I/C HR/ ER ER,DRILLING ED यांच्या बरोबर मीटिंग घेण्यात आली.
पेट्रोलियम ,एम्प्लॉईस युनियन तर्फे श्री सुरेश ननावरे साहेब (GS, PEU) श्री संतोष पाटील (DGS, PEU ) श्री संदीप रेवंडकर ( DGS, PEU) श्री श्रीकांत हरवंदे ( SEC B&S ) श्री श्रीनिवास आचार्य ( ex memb) हे आपले पदाधिकारी मीटिंग करिता उपस्थित होते, सदर मीटिंगचा वृत्तांत खलील प्रमाणे,
◆ फक्त स्टाफ साठी पार्ले इंटरनॅशनल हे हॉटेल QUARANTINE साठी देणे हे अन्यायकारक सद्यपरिस्थित अमानवीय असल्याची ठाम भूमिका आपण अस्थापणेकडे मांडलेली असून त्यावर आस्थापणेने सदर हॉटेल हे केवळ स्टाफ करिता नसून स्टाफ आणि executives सगळ्यांकरिता आरक्षित ठेवण्यात आल्याचा खुलासा केला आहे तसेच यावर आपण संबंधित विभागाशी बोलून सदर गैरसमज लवकरच दूर करू तसेच उद्यापासून सर्व एम्प्लॉईस ना आधीच्याच सर्व हॉटेलवर पाठवण्यात येईल तसेच आज आणि कालच्या hotel parle येथील कामगरांबद्दल उद्या निर्णय घेण्यात येईल. ◆नव्याने रुजू होऊन १ वर्ष पूर्ण झालेल्या आपल्या सर्व एम्प्लॉईस ना अजून CONFIRMATION LETTER मिळालेले नसल्याचे आपण अस्थापणेच्या निदर्शनास आणून दिले असून त्यावर तोडगा म्हणून संबंधित HR ने स्वतः पोलीस नाहरकत प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज करून मिळवण्यात यावे अशी मागणी आपण केली आहे. ◆ ऑफशोर एम्प्लॉईस च्या हक्काचा प्रलंबित ओव्हरटाईम हा कामगारांना विनाविलंब देण्यात यावा याची मागनी आपण केली असता सदर बाब ही HEADQUARTER ला वर्ग करण्यात आली असून लवकरच त्यावर आपल्याला सकारात्मक मान्यता अपेक्षित आहे असे अस्थापणेने खात्री दिली आहे. ◆ OWN ARRENGEMENT करून ड्युटी करीत आलेले एम्प्लॉईस तसेच ड्युटी वरून जातांना OWN ARRENGEMENT करून घरी गेलेल्या एम्प्लॉईस चे आणि होम QUARANTINE करिता HOTEL मध्ये सक्तीमुळे राहिलेल्या सर्व एम्प्लॉईस ना त्यांचे CLAIMS तात्काळ मिळण्याची मागणी आपण केली आहे. ◆ अस्थापणेच्या नवीन LEAVE RULE मधील दि. ०८/०६/२०२० या CUT OFF प्रमाणे महाराष्ट्रात सर्वात जास्त COVID रुग्ण असल्यामुळे सदर तारखेपर्यंत सर्व सुरळीत झालेले नव्हते, तसेच या ऑर्डर संदर्भात इतरही काही समस्या असल्याने त्या बाबतीत सविस्तर पत्र आपण आस्थापणेला लवकरच देणार असल्याची कल्पना देण्यात आलेली आहे.
फक्त पत्र नाही पत्राबरोबर प्रत्यक्ष दणका सुद्धा!!!!