ऑफशोअर मध्ये कार्यरत बांधवांनो आणि भगिनींनो💐.

दि. १७/०५/२४ रोजी management ने काढलेल्या २१ दिवसांच्या on-off pattern संबंधी order च्या विरोधात Petroleum Employees Union कडून होणाऱ्या पुढील Agitation Program संदर्भात माहिती देण्यासाठी सर्व रिग्स आणि platforms सोबत VC मिटींग आज दि. 21.05.24 रोजी सायंकाळी 09.30 वा. आयोजीत करण्यात आलेली आहे. या मिटींग साठीची link पुढीलप्रमाणे आहे.:

https://meet.google.com/yqi-pwfu-bjs

( टीप: meeting मध्ये join होतांना एकत्र जमुन एकाच id ने join व्हावे, join होतांना Name मध्ये आपल्या Rig / platform चे नाव लिहावे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना meeting मध्ये समाविष्ट करून घेता येइल).

या मिटींग मध्ये सर्वानी उपस्थित राहुन , आपआपसातील मतभेद विसरून या Agitation Program मध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन , व्यवस्थापनाच्या एकतर्फी निर्णया विरोधात आपल्या एकतेची ताकद दाखवुन देऊया.

संतोष ज. पाटील
जनरल सेक्रेटरी,
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन(मान्यताप्राप्त),
डब्लू.ओ.यु. ओएनजीसी, मुंबई🚩🚩.

Posted in Uncategorized | Comments Off on

*STRIKE…STRIKE…STRIKE

सहकारी कामगार बंधू आणि भगिनींनो..!

🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴

आपल्या सर्वांना माहीतच आहे आज दि. २१.०५.२०२४ रोजी, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तर्फे २१ दिवस ऑन-ऑफ ऑफ़शोअर ड्युटी पॅटर्न हे कामगार विरोधी धोरण आणू पाहणाऱ्या व्यवस्थापणे विरुद्ध तीव्र जनाक्रोश आंदोलन छेडण्यात आले आहे. आज आंदोलनाचा पहिलाच दिवस असून त्यामध्ये कामगारांनी मोठ्याप्रमाणात स्फूर्तपणे दिलेला प्रतिसाद या आंदोलनाची गंभीरता, व्यापकता व पुढील दिशा स्पष्ट करते व त्याचीच धडकी व्यवस्थापणाच्या मनात भरली आहे यात तिळमात्र शंका नाही.*

*त्यामुळेच आज दुपारी व्यवस्थापणेकडून पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या सहमतीने कलेक्टिव्ह सोबत तातडीची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये आपण आपल्या मागणीवर आपण ठाम राहिलो आहोत आणि त्याप्रमाणे आपण आपला पुढील कार्यक्रम चालू ठेवला आहे आणि आजुन तीव्र करणार आहोत.*

व्यवस्थापणेंन औद्योगिक विवाद अधिनियम १९४६( Industrial Dispute Act 1946) चं उल्लंघन करून व कायदा झुगारून जुलमी आणि कामगार विरोधी ऑफिस ऑर्डर आणली ती ताबडतोब रद्द झाली पाहिजेत या आपल्या भूमिकेवर पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन ठाम आहे याबाबत आस्थापनेला ठणकावून सांगितले आहे आणि आपण यापुढील कार्यक्रम आजुन तीव्र करणार असल्याचे देखील ठणकवण्यात आले आहे आणि याकरिता यापुढे देखील आजसारखे आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभाग हा महत्त्वाचा आहे सर्वांनी याची नोंद घ्यावी..

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

आजच्या आंदोलनाची काही छायाचित्रे:

Posted in Uncategorized | Comments Off on

सहकारी बंधू आणि भगिनींनो..!💐

युनियन तर्फे देण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार उद्या दि. २१.०५.२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता वसुधरा भवन येथे आपल्याला मोठ्याप्रमाणत उपस्थितीत राहावयाचे आहे. स्ट्राईक कॉल असल्याने प्रत्येकाने ड्रेस कोड फॉलो करावयाचा आहे. ड्रेस कोड मध्ये काळ्या रंगाचे शर्ट(Black Shirt)/ काळ्या रंगाची टीशर्ट(Black T-shirt) किंवा गडद रंगाचा ड्रेस(Dark colors dress) असणे आवश्यक आहे. कोणीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून येऊ नये अशी सूचना युनियन कडून करण्यात येत आहे कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी..

जो पर्यंत व्यवस्थापणेकडून आलेली ऑफिस ऑर्डर रद्दबातल होत नाही तो पर्यंत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तीच्या स्ट्राईक कॉल वर ठाम आहे व ती मागे सरणार नाही हे याद्वारे आपणास स्फूर्तपणे कळविण्यात येत आहे..!

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on

[blink] Slogans for program [/blink]

🏴🏴 STRIKE STRIKE STRIKE.. 🏴🏴

होय या अन्यायाविरोधात..!
होय या जाचक नियमाविरोधत..!
होय या हुकूमशाही विरोधात..!
होय चुकीच्या धोरणाविरोधात..!

आता नाही तर कधीच नाही..!!

सर्व कामगार बांधवांना विनंती जर आपण ऑफ मध्ये आहात तर मंगळवार, बुधवार व शुक्रवार स्वयंस्फूर्तीने ह्या एकाधिकारशाही लादू पाहणाऱ्या व्यवस्थापना विरोधात एकत्र या आणि आपल्यावर होणारा हा अन्याय मोडीत काढण्यासाठी आपण सर्व सामील व्हा..! या मुजोर व्यवस्थापनाला आपली जागा दाखवण्याची हीच अचूक संधी व वेळ आहे..!!!

सर्व मतभेद विसरा फक्त एकच लक्षात ठेवा आपला अधिकार..!!

जन आक्रोश..!👊
जन प्रक्षोभ..!!👊

आता फक्त एकच ध्येय, जन आंदोलन आपल्या हक्कासाठी..!!!

कामगार विरोधी व्यवस्थापने विरुद्ध होत असलेल्या ह्या जनआंदोलनात जास्तीत जास्त संख्येने कामगारांनी सहभागी व्हावे असे आव्हान पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन या द्वारे करते आहे..

🙏🏻पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन 🙏🏻
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई🚩🚩🚩🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on

बंधू आणि भगिनींनो,
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मान्यता प्राप्ती नंतर लगेचच ऑफशोअर आणि ऑनशोअर कामगारांच्या असलेल्या विविध समस्यांवर चर्चे करिता bilateral मीटिंग ची मागणी आपल्या पत्राद्वारे करण्यात आली होती.

आपल्या माहितीप्रमाणे जवळ जवळ १४ वर्षं अश्या प्रकारची मीटिंग यापूर्वी कधीच झाली नसल्याने आणि पहिल्यांदाच आपण अश्या प्रकारे मीटिंग केल्याबद्दल आस्थापनेचे देखील धाबे दणाणले.

आज दि.०४/०५/२०२४ रोजी WOU च्या सर्व KEY EXECUTIVES बरोबर ही बैठक संपन्न झाली, ज्यामध्ये श्री.C. MATHAVAN साहेब ED WOU Mumbai, श्री.V V प्रसाद ED CDS, श्री.अजय कुमार शर्मा ED ASSET MANAGER MH ASSET, श्री.रवी शंकर ED ASSET MANAGER B&S, श्री.अमित देसाई ED HDS, श्री.B C GOEL GGM HEAD RO MUMBAI, I/C MEDICAL श्री शेनॉय साहेब हे उपस्थित होते ज्यामध्ये आपल्या दिलेल्या ऑफशोअर मधील व वर्क सेंटर(ऑफिसेस) संदर्भातील SAFETY व इतर वेल्फेअर च्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

गेल्या १४ वर्षांमधील प्रलंबित असलेल्या विषयांवर अस्थपनेन आश्चर्य व्यक्त केले व आपल्या पत्रा मधील व इतर जवळ जवळ ८० विषयांवर सकारात्मक चर्चा करून विषय लवकरात लवकर सोडविण्याचे मान्य केले. तसेच झालेल्या सर्व विषयांवर लवकरच MINUTES प्रकाशित करण्यात येतील.

कामगार एकता जिंदाबाद!!!
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन जिंदाबाद!!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on