This is the new official website of PEU, Mumbai. Petroleum Employees Union,Mumbai is the recognized union of employees working in Mumbai region this is the official website of the Petroleum Employees Union,Mumbai.PEU Mumbai & KS Mumbai i.e. Karmachari Sanghatana are the 2 unions present in Mumbai region.
Strike call from Team PEU @ All work station in WOU.
Starts from: 9th July 2025
For issues:-
Unsafe Conditions at Mumbai Offshore, PPE , irregular supply of Foodbox, pathetic living conditions, shortage of manpower and Implementation of O&M at Ongc Core Activities.
मेडिकल बिल मधील स्पेशल क्लेम करण्याकरिता ओएनजीसी डॉक्टरचे सर्टिफिकेशन गरजेचे असल्याची अट असल्याचे टीपीआयकडून सांगण्यात येत होते तसेच प्रलंबित बिल त्यासंदर्भात आज इंचार्ज मेडिकल व इन्चार्ज HR ER यांच्याबरोबर मीटिंग करून समस्या मांडण्यात आली ज्यावर यापुढे सदर सर्टिफिकेशन ची अट रद्द करण्यात आली आहे व TPI ला योग्य ते निर्देश देण्यात येतील हे स्पष्ट करण्यात आले. तसेच प्रलंबित बिले देखील लवकरच क्लियर करण्याचे मान्य केले. सदर मिटींगला जनरल सेक्रेटरी श्री संतोष पाटील साहेब श्री दत्ता तावडे व श्री विलास फडके उपस्थित होते.
सध्या CPP व TA बिलांसंदर्भात अनेक तक्रारी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन कडे आल्या होत्या. यासंदर्भात आज पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन चे जनरल सेक्रेटरी श्री. संतोष पाटील साहेब, श्री. आशिष जग्यासी व इतर पदाधिकाऱ्यांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. काही issues वर सकारात्मक चर्चा होऊन योग्य निर्णय झाला आहे , काही issue बद्दल संबंधीत अधिकार्यानी थोडा वेळ मागितला आहे. पुढील ३-४ दिवसांत पुन्हा एकदा बैठक घेऊन सर्व अडचणी सोडविण्यात येतील. तोवर जर TA बिलासंबधी काही अडचण असेल तर ते TA बिल सबमिट करू नये तसेच संबंधीत अधिकार्याशी ही त्या अडचणी बाबत सध्या संपर्क करू नये, लवकरच आपणास पुढील अपडेट कळविण्यात येईल. TA बिलासंबंधी काही अडचण असल्यास 7710091222 या क्रमांकावर श्री. जग्यासी यांच्याशी संपर्क साधावा.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, मान्यताप्राप्त युनियन, डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई