प्रिय बंधू-भगिनींनो,

दि. ०१ जुलै २०२५ रोजी झालेल्या युनियन आणि व्यवस्थापनाच्या बैठकीत ऑफशोरमधील लिव्हिंग कंडिशन्स, फर्निचरची दयनीय अवस्था, मॉड्यूल्सची जीर्ण स्थिती आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांवरील प्रश्न ठामपणे मांडण्यात आले होते. त्या बैठकीनंतर संघटनेने नियमितपणे या विषयाचा पाठपुरावा करत व्यवस्थापनावर सातत्याने दबाव ठेवला. या अखंड प्रयत्नांचे आज ठोस फलित दिसून येत आहे.

दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी SCA साठी एक कंटेनर, SHP साठी दोन कंटेनर आणि WIN साठी एक कंटेनर असे एकूण चार कंटेनर रवाना करण्यात आले आहेत. MHN येथे फर्निचर बसवून झाले असून, SHP या प्लॅटफॉर्मवर अंदाजे ५० टक्के फर्निचर पोहोचले आहे. तसेच B&S Asset आणि MH Asset साठी वेश्वी आणि न्हावा येथे फर्निचर पोहोचलेले आहे, परंतु मॉन्सून दरम्यान कंटेनर मिळाले नसल्याने सदरील फर्निचर ऑफशोअरला पाठवले गेले नाही. तरी सदरील फर्निचर B&S Asset आणि MH Asset येथे लवकरात लवकर पोहोचविण्याचे काम चालू आहे, तर NH Asset साठीचे फर्निचर मागील वर्षातच वितरीत केल्याने यावर्षी त्यांना देण्यात आले नाही. तसेच राहिलेले उर्वरित वितरणाचे काम जलदगतीने सुरू असून, राहिलेल्या सर्व प्लॅटफॉर्मवर लवकरच नवीन व दर्जेदार फर्निचर उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी.

याशिवाय, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या सततच्या पाठपुराव्यामुळे BPB, TAPTI आणि B193 या प्लॅटफॉर्म्ससाठीचे फर्निचर येत्या १५ दिवसांत पोहोचविण्यात येईल, असे न्हावा हेड यांनी आश्वासन दिले आहे. सदरहूबाबत न्हावा हेड यांच्यासोबत प्रत्यक्ष संवाद वसुधरा भवनचे सेक्रेटरी श्री. शेख साहेबांनी साधला असून, BPA येथील फर्निचरही लवकरात लवकर पोहोचवले जाईल, याची खात्री करून घेण्यात आली आहे.

ही प्रगती म्हणजे आपल्या सर्वांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे आणि संघटनेच्या ठाम भूमिकेचे फळ आहे. कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा, सुसज्ज निवासव्यवस्था आणि सुरक्षित कार्यपरिसर मिळावा, या दृष्टीने पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन सातत्याने प्रयत्नशील आहे. आपण दाखवलेला विश्वास आणि एकजूट हीच आमची प्रेरणा आहे, आणि हाच लढा पुढेही संघटितपणे सुरू राहील.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन
(मान्यताप्राप्त युनियन)
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.