बंधू आणि भगिनींनो!

दि. ०७/०८/२०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या ओव्हरटाईम आणि C-OFF संदर्भातील चुकीच्या आदेशाच्या विरोधात, ऑफशोअरमधील कामगार बांधवांचे हक्काचे नॅशनल हॉलिडेज तसेच १४ दिवसांनंतर मिळणारे ओव्हरटाईम आणि सी-ऑफ यासकट १६ GH सर्व शिफ्ट ड्युटी व ऑफशोअरमधील बांधवांना मिळावेत, या आणि इतर गंभीर विषयांवर पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने स्ट्राईक नोटीस दिली होती. या संदर्भात दिल्ली येथे आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत आस्थापनेने NH, GH आणि १४ दिवसांनंतरचे ओव्हरटाईम व C-Off संदर्भातील ऑर्डरचे पुनरावलोकन करण्यास मान्यता दिली तसेच सुधारित आदेश लवकरच काढण्याचे आश्वासन दिले.

आज दिनांक १५/०९/२०२५ रोजी मा. रिजनल लेबर कमिशनर यांच्याकडे आपल्या याच स्ट्राईक नोटीस संदर्भातील कन्सिलेशन पार पडले. या कन्सिलेशनदरम्यान युनियनने व्यवस्थापनाने सेक्शन ९ए नुसार आवश्यक ती माहिती न दिल्याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला.

या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत मा. रिजनल लेबर कमिशनर साहेबांनी व्यवस्थापनाला स्पष्ट सल्ला दिला आहे की दिनांक ०७/०८/२०२५ चा आदेश लागू करू नये. पुढील सुनावणी २४/०९/२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार असून या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ओएनजीसी मुख्यालयालाही उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दोन्ही पक्षांनी औद्योगिक वाद कायदा, १९४७ मधील सेक्शन २२ आणि सेक्शन ३३ चे काटेकोर पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.

✊ हे कन्सिलेशन कामगारांच्या लढ्याला नवे बळ देणारे असून युनियनची भूमिका योग्य व वैध असल्याचे अधोरेखित करणारे आहे. आपल्या दिल्ली येथील बैठकीप्रमाणे आस्थापनेने आपला शब्द पाळून हा चुकीचा आदेश पुनरावलोकित केला, तर आंदोलनाची गरज भासणार नाही. अन्यथा आपला हक्क आणि अधिकार अबाधित राखण्यासाठी आंदोलनाचा बडगा उचलण्याखेरीज आपल्याला पर्याय राहणार नाही, ही खूणगाठ आपण बांधून पुढील तयारीला लागूया.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु., ओएनजीसी, मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.