Dear Brothers and Sisters ,

The management has turned a blind eye to the interests of the workers and has made illegal alterations in the declared government holidays. This decision is a direct injustice to the working class and an attack on our fundamental rights.

In protest against this injustice, the Petroleum Employees Union has taken a firm stand and has served a strike notice to the Labour Commissioner. Recognizing the seriousness of the matter, the Labour Commissioner has immediately convened a conciliation meeting under Section 12 of the Industrial Disputes Act, 1947.

This meeting is scheduled to be held on 10.09.2025 at 1:00 PM in the office of the Labour Commissioner.

Brothers and sisters,
We have always stood united and raised our voice against injustice. This time too, your cooperation and unwavering support are expected. Let us all stand shoulder to shoulder for our rights and justice.

Petroleum Employees Union
(Recognized Union)
W.O.U, ONGC, Mumbai*

प्रिय बंधू आणि भगिनींनो,

व्यवस्थापनाने कामगारांच्या हिताकडे डोळेझाक करून शासकीय सुट्ट्यांमध्ये बेकायदेशीर बदल केले आहेत. हा निर्णय हा थेट कामगार वर्गावरील अन्याय असून, आपल्या मूलभूत अधिकारांवर घाला घालणारा आहे.

या अन्यायाविरोधात पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने निर्भीडपणे पावले उचलली आहेत आणि कामगार आयुक्तांकडे स्ट्राईक नोटीस दिली आहे. विषयाच्या गांभीर्याची जाणीव होताच कामगार आयुक्तांनी Industrial Disputes Act, 1947 च्या कलम 12 अंतर्गत तातडीने समेट बैठक बोलावली आहे.

ही बैठक दि. 10.09.2025 रोजी दुपारी 1:00 वाजता, कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात होणार आहे.

आपण नेहमीच एकजूट होऊन आपली ताकद दाखवली आहे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. आपल्याकडून नेहमीप्रमाणे मिळत असलेलं सहकार्य यावेळी देखील अपेक्षित आहेच. आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून उभे राहणे हाच काळाचा आदेश आहे.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.