प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आपणास ठाऊकच आहे की, कोविड-१९ कालावधीतील (२३ मार्च २०२० ते १० एप्रिल २०२१) प्रलंबित ओव्हरटाईम क्लेम संदर्भात पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनमार्फत कामगार आयुक्त कार्यालयात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

पूर्वीही यासंदर्भात आपल्या ओरिजिनल ओव्हरटाईम क्लेम फॉर्म युनियन कार्यालयात सादर करण्याबाबत सूचना देण्यात आली होती. मात्र अजूनही काही कामगार बांधवांचे फॉर्म युनियनकडे प्राप्त झालेले नाहीत.

टीप:
आपण जे ७ दिवसांचे क्लेम करत आहात त्यात जर एखाद्या दिवशी १२ तासांहून अधिक ड्युटी घेतली असेल आणि त्याचा काही भाग आधी मिळाला असेल, तर कृपया ती माहिती फॉर्मवर स्पष्ट नमूद करावी.

म्हणून स्पष्ट सूचित करण्यात येत आहे की:
आपले वैयक्तिक ओव्हरटाईम फॉर्म ३१ जुलै, २०२५ पर्यंत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन कार्यालयात
किंवा युनियनच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांकडे अवश्य जमा करावेत.

⚠️ ३१ जुलै २०२५ नंतर आलेले कोणतेही फॉर्म लेबर कोर्टाद्वारे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

हा ओव्हरटाईम आपला कायदेशीर हक्क आहे. तो मिळवण्यासाठी आपल्याला प्रक्रियेतून जायला लागणार आहे. यासाठी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे ओव्हरटाईम फॉर्म वेळेत सादर करून युनियनला सहकार्य करावे.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी,मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.