प्रिय बंधू आणि भगिनींनो,

PEU चा दणका!!!!
डांगरी ( कॉटन कव्हरऑल) लवकरच मिळणार

आपणा सर्वांस माहितीच आहे की safety शी संबधीत PPE( डांगरी, शूज, हेलमेट, हँडग्लोव्ह्स, किट आणि लिव्हरीज यांच्या वितरणात झालेली प्रचंड दिरंगाई, फ़ूड बॉक्स करीता होत असलेला १०/१२ दिवसांचा विलंब, ऑफशोर मधील लिविंग कंडिशन ची दयनीय अवस्था ( फर्नीचर, बिल्डिंग मॉड्यूल) याचबरोबर खाजगी manpower, आणि खाजगीकरणासारख्या गंभीर विषयांवर पेट्रोलियम एम्प्लाईज युनियन ने दी. २५/०६/२०२५ पासून स्ट्राइक नोटिस दिली होती. यासंदर्भात मॅनेजमेंट ने दि.०१/०७/२५ रोजी पेट्रोलियम एम्प्लाईज युनियन च्या पदाधिकार्‍यांसोबत मिंटीग घेतली होती, यात सर्व विषयांवर सखोल चर्चा झाली. डांगरीज वेळेवर न दिल्याबद्दल PEU ने कडक शब्दांत निषेध नोंदवला होता, याची दखल घेत व्यवस्थापनाने तातडीची कार्यवाही सुरु केली असून लवकर च डांगरीज ( cotton coverall) बोर्ड परचेस च्या माध्यमाद्वारे खरेदी करण्यात येणार आहेत. *आपल्या पर्यत लवकरच डांगरीज पोहचतील. तसेच सर्व PPE items ही बोर्ड परचेस व्दारे घेता याव्यात यासाठी MCOD मध्ये हा विषय मांडून त्यावर मान्यता मिळावी याकरिता देखील प्रोसेस सुरू करण्यात आली आहे.

मित्रांनो, पेट्रोलियम एम्प्लाईज युनियन कामगारांच्या भल्यासाठी २१ दिवसांच्या ड्युटी पॅटर्न विरोधात न्यायालयीन लढाई, safety issues संदर्भातील लढाई, वेलफेयर issues मार्गी लावणे यासाठी युद्ध पातळी वर कार्यरत आहे. आपल्या सर्वांच्या साथीने लवकर च सर्व विषय मार्गी लागतील.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.