निषेध!! निषेध!! निषेध!!!!
कामगार बंधू आणि भगिनींनो!
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन द्वारे ऑफशोअर सेफ्टी, पी.पी.ई(PPE), ऑफशोर मधील इन्स्टॉलेशन वरील फर्नीचर, रूम, गॅलीची दयनीय अवस्था, फ़ूड बॉक्सची दिरंगाई त्याचबरोबर खाजगीकरणाच्या समस्यांबाबत ओएनजीसी व्यवस्थापनाला दिनांक २४ जून २०२५ रोजी स्ट्राईक नोटिस देण्यात आली होती. त्याची तातडीने दखल घेत ओएनजीसी व्यवस्थपना कडून पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियनला दि. ०१/०७/२०२५ रोजी बैठकी करिता बोलवण्यात आले होते.
या संदर्भात आज मा. कामगार आयुक्त यांच्या दालनात ही स्ट्राईक नोटिस दाखल होऊन आज दिनांक ०८ जुलै, २०२५ रोजी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन व ओएनजीसी व्यवस्थापन यांच्यात कन्सिलेशन मिटिंग पार पडली या अनुषंगाने तसेच उद्या दिनांक ०९ जुलै, २०२५ रोजी सेंट्रल ट्रेड युनियन्स यांनी एकत्रित रित्या देशव्यापी संप पुकारला आहे या संदर्भात पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनची ०९ जुलै, २०२५ ला होणाऱ्या स्ट्राईक बाबत मा. कामगार आयुक्त यांच्या कोर्टात कन्सिलेशन कॉल असल्याने पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनला इतर कोणताही स्ट्राईक कॉल देता येत नाही व ह्याबाबत आपण कायद्यास बांधील ही आहोत.
उद्या सेंट्रल ट्रेड युनियनच्या देशव्यापी संपाच्या स्ट्राईक प्रोग्राम मध्ये हंगर स्ट्राईक करण्याबाबत कोणताही कॉल नसल्याने उद्याच्या देशव्यापी संपात आपण फक्त काळ्या फिती ( Black Badge)लावून आपला निषेधात्मक सहभाग नोंदवावा. असं आव्हान पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन करत आहे
सदर संप कोणत्याही स्थानिक संघटनांनी बोलावलेला नाही परंतु पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस-इंटक (सेंट्रल ट्रेड युनियन) सोबत संलग्नित असल्याने उद्याच्या देशव्यापी संपात आपण देखील सहभाग नोंदवित आहोत.
टीप: उद्याचा देशव्यापी संप हा सेंट्रल ट्रेड युनियन्सचा असून, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तर्फे उद्या हाऊ घातलेली ऑफशोर सेफ्टी संदर्भातील स्ट्राईक बाबत आपल्याला लवकरच व्हीसी द्वारे कळविण्यात येईल. सेफ्टी इश्यूज, खाजगीकरण, कामगार भरती ह्याबाबत येत्या काळात कन्सिलेशन मधील निर्णया नंतर तीव्र आंदोलनाची तयारी आपण केली असून या दोन्ही विषयांना धरून संयुक्तिक स्ट्राईक करिता लवकरच आपल्याला कळवण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई
