प्रिय बंधू आणि भगिनींनो,
सध्या CPP व TA बिलांसंदर्भात अनेक तक्रारी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन कडे आल्या होत्या. यासंदर्भात आज पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन चे जनरल सेक्रेटरी श्री. संतोष पाटील साहेब, श्री. आशिष जग्यासी व इतर पदाधिकाऱ्यांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. काही issues वर सकारात्मक चर्चा होऊन योग्य निर्णय झाला आहे , काही issue बद्दल संबंधीत अधिकार्यानी थोडा वेळ मागितला आहे. पुढील ३-४ दिवसांत पुन्हा एकदा बैठक घेऊन सर्व अडचणी सोडविण्यात येतील. तोवर जर TA बिलासंबधी काही अडचण असेल तर ते TA बिल सबमिट करू नये तसेच संबंधीत अधिकार्याशी ही त्या अडचणी बाबत सध्या संपर्क करू नये, लवकरच आपणास पुढील अपडेट कळविण्यात येईल. TA बिलासंबंधी काही अडचण असल्यास 7710091222 या क्रमांकावर श्री. जग्यासी यांच्याशी संपर्क साधावा.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई