प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आपल्याला माहीतच आहे की, २९.०८.२०२४ ला व्यवस्थापनेकडून ऑफशोअरला जाणाऱ्या ऍम्प्लॉईजना फास्ट क्रु-बोटीने पाठवण्याबाबतची एकतर्फी ऑर्डर काढण्यात आली होती.

त्यावर सदर विषयाची गंभीरता लक्षात घेऊन पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने ताबडतोब व्यवस्थापनेला घेराव करून व पत्र पाठवून फास्ट क्रु-बोटी ने कामगार जाणार नाहीत व आपण कामगारांची एक जबाबदार युनियन म्हणून आलेल्या ऑर्डरचा जाहीर निषेध व विरोध करतो असे ठणकावून सांगण्यात आले.

सदर पत्राचा परिणाम म्हणून व सदर बाबतचा पाठपुरावा करण्यासाठी आज सकाळी ED-WOU यांची भेट घेऊन जाब विचारला असता, व्यवस्थापनाने फास्ट क्रु-बोटीने फक्त कंत्राटी कामगारच(Contracutal Manpower) जातील आणि ओएनजीसी ऍम्प्लॉई जाणार नाहीत असे स्पष्ट केले. पुढील दिशा ठरवण्याआधीच आपल्या पहिल्याच प्रयत्नाला यश आले आहे.

टीप: फास्ट क्रु-बोटीने फक्त Contractual Manpower च जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी…!

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.