सहकारी बंधू आणि भगिनींनो..!
संवैधानिक लढ्याचा पहिला विजय…
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने व्यवस्थापनाच्या कामगार विरोधी २१ दिवस ऑन-ऑफ ड्युटी पॅटर्न ऑफिस ऑर्डरच्या विरोधात ताकदीने आंदोलन उभारलं होतं त्याची दखल उप-मुख्य श्रमायुक्त (Dy.Chief Labour Commisioner) यांनी घेत आज दिनांक २४.०५.२०२४ रोजी संध्याकाळी ०३:०० वाजता सदर प्रकरणावर सुनावणी करीता दोन्ही पक्षकारांना बोलावण्यात आलं होतं. बैठकीत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या वतीने जनरल सेक्रेटरी मा. श्री. संतोष पाटील साहेब, श्री. सुरेश ननावरे साहेब, श्री. दत्ता तावडे, श्री. श्रीनिवास आचार्य, श्री. आशिष जग्यासी तर व्यवस्थापना कडून श्री. बलियार सिंह- प्रभारी एचआर ईआर आरओ, श्री. विवेक झिणे- प्रभारी आईआर व इतर लोकं उपस्थित होती
आपण दिलेल्या पाठबळामुळे आपल्या आंदोलनाला मिळालेला हा पहिला विजय आहे. सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन कडून व्यवस्थापनाची चूक Dy. CLC यांच्या लक्षात आणून देतांना व्यवस्थापनेणं औद्योगिक वादविवाद अधिनियम १९४७ (Industrial Dispute Act 1947) च्या ९ए(9A)चं उल्लंघन करून एकतर्फी ऑर्डर काढली व ती कामगारांवर लादल्या गेली असे ठामपणे मत मांडले व सदर प्रकरण Dy. CLC यांच्या निदर्शनास आणून दिले त्यावेळी Dy. CLC यांच्या द्वारे व्यवस्थापनेची कानउघाडणी करत व्यवस्थापन पूर्णपणे चुकीचे आहे व व्यवस्थापनेकडून Industrial Dispute Act, 1947 च्या रूल नंबर 9A चं उल्लंघन झालं असून या पुढे असे कोणतेही कृत्य जे कायद्याला धरून नसेल ते होता कामा नये असे व्यवस्थापनाला ठणकावून सांगण्यात आले. दरम्यान कायद्याच्या चौकटीत राहून Dy. CLC यांनी ह्या ऑफीस ऑर्डरला Industrial Dispute Act 1947 Sub Rule 33A नुसार स्थगिती दिली आहे.
दरम्यान जो पर्यंत सदर प्रकरणावर सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत व्यवस्थापनाने काढलेली ऑफीस ऑर्डर लागू होणार नसून १४ दिवस ऑन-ऑफ ड्युटी पॅटर्न नुसारच ऑफ़शोअर एम्प्लॉईज कर्तव्यावर जातील अशी भूमिका Dy. CLC यांच्या मध्यस्थीने घेतली आहे. पुढील हिअरिंग दिनांक ३१.०५.२०२४ रोजी संध्याकाळी ठीक ०३:३० वाजता ठेवण्यात आलेली आहे.
हा आपल्या संवैधानिक लढ्याला आलेला पहिला विजय आहे आणि आपण आपल्या भूमिकेवर ठाम असून पुढील लढाई संवैधानिक पद्धतीनेच सुरू ठेवणार आहोत. आपण आता पर्यंत ह्या आंदोलनास समर्थन, पाठबळ व सहभाग दर्शविला त्यासाठी आपल्या सगळ्यांचे आभार व हे पाठबळ असंच पुढेही कायम राहील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन व्यवस्थापनाने आणलेली कामगार विरोधी ऑफिस ऑर्डर रद्द केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आपणास देत आहे..!
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई