🚩मित्रांनो, 🚩

दि. 18/01/2022 रोजी तसेच दि.31/01/2022 रोजी ठरल्याप्रमाणे आज दि. 01/02/2022 रोजी वसुधारा भवन येथे आयोजित आस्थापन आणि सर्व collectives मधील मीटिंग करीता पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियनतर्फे श्री संतोष पाटील साहेब G.S.PEU, श्री दत्ता तावडे SEC. PEU, तसेच श्री.उमेश जमखंडे JT.SEC DRILLING, PEU उपस्थित होते.
आपल्या ऑफशोर मधील बांधवांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली त्यापैकी काही महत्वाच्या बाबी खालील प्रमाणे:-

1) हॉटेल quarantinne चा कालावधी कमी करावा हि मागणी आपण सुरवातीपासून लावून धरली त्यावर आस्थापनेकडे हॉटेल च्या पहिल्याच दिवशी टेस्टिंग ची मागणी सर्व कलेक्टिव्हस तर्फे करण्यात आली ज्यावर सर्व उपलब्धता पाहून आस्थापनेने त्याच दिवशी टेस्टिंग करण्याचे व रिपोर्ट आल्यावर लगेचच ऑफशोर ला पाठवण्याचे मान्य केले आहे.

2) त्याकरीता ADDITIONAL टेस्टिंग agency बरोबर टायअप करून दिवसात 2 वेळा टेस्टिंग करण्याची व्यवस्था करण्याकरिता मेडिकल इंचार्जे यांनी मान्य केले आहे.

3)हॉटेल QUARANTINE मध्ये असताना मेनू मध्ये सुधारणा करण्याचे तसेच ( CHOICE MENU) इतरही पर्याय पडताळण्याचे हॉस्पिटॅलिटी विभागाने मान्य केले आहे.

4) यापुढील review मीटिंग देखील लवकरच करण्याचे आस्थापनेने मान्य केले असून पुढील review मीटिंग मध्ये RTPCR TESTING AT HOME (घरून येताना RTPCR टेस्ट) ची मागणी आपण केली आहे. यावर आस्थापनेने पुढील मीटिंग मध्ये चर्चा करण्याचे आश्वासन आस्थापनेने दिले आहे.

संतोष ज पाटील.
G.S.
पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन, मुंबई. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.