[blink]New[/blink]

ऑफशोर एम्प्लॉयीसच्या माहितीकरिता !!
काल दि. 02/8/2021 रोजी HRO सुनील सिंग साहेब, मेडिकल इंचार्ज डॉ.माधुरी कलीता मॅडम यांच्या सोबत प्रथम सत्रात व दुसऱ्या सत्रात इंचार्जे H & W संजय लाल यांच्याबरोबर खालील विषयांवर सकारात्मक चर्चा झाली:

1) लसीकरणाचे DOSE झालेल्या कामगारांना QUARANTINE मधून सूट मिळावी अशी तीव्र मागणी पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन तर्फे आपल्या दि.26/07/2021 च्या पत्राद्वारे तसेच दि.28/07/2021 च्या संबंधित EDs बरोबरच्या चर्चेदरम्यान करण्यात आली त्यासंदर्भात MANAGEMENT तर्फे लसीकरणाचे 2 DOSE झालेल्याना QUARANTIEN मधून सूट देण्यासाठीचे प्रस्तावHEADQUARTER ला पाठवण्यात आलेला आहे व यासंदर्भातील निर्णय लवकरच अपेक्षित आहे. तसेच पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन तर्फे लसीकरणाचा 1 DOSE झालेल्या एम्प्लॉयीसना सुद्धा सदर सूट देण्याचा मागणीचा पुनर्रउच्चर केला. MANAGEMENT ने यासाठी CHIEF MEDICAL SERVICIES सोबत सल्ला मसलत करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
2) त्याचबरोबर आपल्या सुज्ञ कामगारांनी पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियनला ई-मेल द्वारे व फोनद्वारे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन HRO श्री सुनील सिंग साहेब यांच्याशी चर्चा करून खालील बाबी ज्या आपल्या दि . 26/07/2021 च्या पत्रामध्ये देखील नमूद आहेत त्यांची विचारणा केली ज्यामध्ये मुख्यत्व हॉटेल मधील जेवण हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आणि बेचव असून सर्व FLOOR साठी कमी CREW असल्यामुळे थंड जेवण SERVE केले जाते, सूप तसेच इतर खाण्यायोग्य पदार्थांची QUANTITY कमी असते, ONGC रूम मधून आलेले फोन कॉल्स रेसेपशन वर घेतले जात नाहीत या QUARANTINE मध्ये असणाऱ्या कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांचा समावेश होता, या बाबतीत आजच हॉटेल लेमन ट्री येथे लंच नंतर SURPRISE VISIT करण्यास आपण सुचविले होते तसेच त्यावर दंडात्मक कारवाई करून सुधार न झाल्यास पुढील मार्ग अवलंबवावा ही मागणी धरून ठेवण्यात आली त्याप्रमाणे हॉटेल मध्ये श्री संजय लाल साहेब तसेच श्री सुबोध कुजूर यांच्यामार्फत VISIT करण्यात आली, यापुढेही हॉटेलची परिस्थिती न सुधारल्यास MANGEMENT आपल्याला मोठे पाऊल उचलण्यास भाग पाडत असल्याचे देखील जाणीव पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन तर्फे करून देण्यात आली आहे.
संपर्कात रहा आपल्या समस्या हि आमची जबाबदारी आहे,
आपल्या सहकार्याने आणि सहभागाने आपण योग्य न्याय मिळवून घेऊ.
पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन, मुंबई
🚩🚩🚩🚩🚩

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.