[blink]New[/blink]

कामगार बंधु व भगिनींनो,

आपण दिनांक २४/०२/२०२१ रोजी दिलेल्या hunger fast च्या नोटीस बद्दल व लेबर कमिशनरनी दिलेल्या Bilateral meeting च्या आदेशानुसार खालील दिलेल्या विषयांवर आज दिनांक ०५/०३/२०२१ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता मॅनेजमेंट बरोबर मीटिंग झाली

पि.इ.यु. तर्फे GS व DGSs उपस्थित होते, व मॅनेजमेंट तर्फे सर्व EDs व IR उपस्थित होते.

विषय क्र १.
ऑफशोर वरील ड्युटी २८ दिवसांच्या ऐवजी १४ दिवसांवर आणण्याचा जो विषय आपण मांडला होता, त्यावर मॅनेजमेंटने २१ दिवसांच्या ड्युटी साठी तात्पुरता निर्णय दिला आहे व येणाऱ्या काळात १४ दिवसांवर तो आणण्याचे आश्वासन दिले आहे

प्लॅटफॉर्म व रिग वर जिथे जिथे शक्य असेल त्या त्या section ला तेथील स्टाफ व OIMनी मिळून ड्युटी २१ दिवसांपेक्षा कमी सुद्धा करू शकतात, असं देखील मॅनेजमेंट कडून सांगण्यात आले.

Hotel Quarantine चा period देखील ०७ वरून ०५ वर आणण्याकरिता मेडिकल इंचार्ज बरोबर चर्चा करून २ दिवसात आपल्याला कळविण्यात येईल

विषय क्र २
१४ दिवसांनंतर च्या OT संदर्भात च्या विषयावर देखील आपण ठाम राहिलो, त्यावर मॅनेजमेंटनी सांगितलं की हा विषय Head Quater ला आहे व मार्च च्या ending पर्यंत Head Quater चा निर्णय  कळवू

आपला जो hunger strike ऑफशोर ड्युटी कमी करण्यासाठी केला होता त्यास आपण तात्पुरता स्थगिती देत आहोत, पुढील युनियन चा आदेश कळविला जाईल

कामगार एकता जिंदाबाद
पि.ई.यु. जिंदाबाद

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन (मुंबई)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.