मित्रहो,
लॉकडाऊन च्या आणि करोना महामारीच्या काळात ओ एन जी सी ऑफशोअर युनिट मध्ये आपण जिद्दीने आपल्या कंपनीसाठी ठाम उभे राहून कार्य अविरत चालू ठेवले पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियनने मॅनेजमेंट बरोबर बराच पत्रव्यवहार केला. आणि सगळ्यात ज्वलंत ओव्हर टाईम मिळण्याबाबत चा विषय मॅनेजमेंट बरोबर सतत पाठपुरावा करून सुद्धा त्यावर काही ठोस असे निर्णय मॅनेजमेंट कडून आले नाही. मीटिंग मध्ये ही काही अपेक्षित खात्रीशीर निष्पन्न झाले नाही.
तसेच नजीकच्या काळात पी. ई. यू. चे डेप्युटी जनरल सेक्रेटरी श्री.संतोष पाटील साहेब यांनी वेगवेगळ्या ऑफशोअर प्लॅटफॉर्म व रिग वरील कामगार बंधूंना सद्यस्थितीचा आढावा दिला आणि मेनेजमेंट चा कल सांगून संभाव्य परिस्थितीचे आकलन करून दिले. त्यामुळे पी. ई. यू ने रिजनल लेबर कमिशनर कडे पत्र व्यवहार केलेले त्याचे कार्यवाही म्हणजे लेबर ऑफिस मधून पी. ई. यू. ला कन्सिलेशन साठी रिजनल लेबर कमिशनर ऑफिस मध्ये बोलावणे आलेले आहे तसेच सदर विषयाबाबत मॅनेजमेंट ला देखील बोलावणे धाडले आहे व सदर बाबिबद्दल जवाब नोंदवा असे सांगण्यात आले आहे.आणि ते मॅनेजमेंट ला बंधन कारक असून त्यामुळे ही मीटिंग येत्या २४/११/२०२० ला दुपारी ३ वाजता लेबर ऑफिस मध्ये आहे.त्याअगोदर मॅनेजमेंट मीटिंग ला बोलावणे अपेक्षित आहेच परंतू पी. ई. यू आपल्या कामगार हिताच्या मतावर ठाम आहे जर काही योग्य अपेक्षित निर्णय घेण्यात मॅनेजमेंट असमर्थ ठरले तर युनियन आणि मॅनेजमेंट मध्ये संघर्ष अटळ आहे व त्याची तयारी म्हणजे टप्प्या टप्प्याने होणारा एजीटेशन कार्यक्रम पी. ई. यू. ने तयार ठेवला आहे व पी. ई. यू. आपले कामगार हिताचे धोरण कधीही बदलणार नाही.त्यामुळे कामगारांनी पी. ई. यू. ला साथ देवून कामगारांच्या हक्कासाठी एकत्र येऊन पी.ई. यू . शी सतत संपर्क ठेवावा व पुढील कार्यक्रमाबद्दल सतत संपर्कात राहावे.
TEAM PEU
कामगार ऎक्याचा विजय असो.
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन झिंदाबाद.
